व्हेज ऑर्डर केले, नॉनव्हेज पाठवले, झोमॅटो, मॅकडोनाल्डवर झाला मोठा दंड; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 02:03 PM2023-10-14T14:03:46+5:302023-10-14T14:04:41+5:30

ऑनलाइन फूड ऑर्डरिंगची सुविधा देणाऱ्या झोमॅटो आणि मॅकडोनाल्ड या कंपन्यांना शाकाहारी जेवणाऐवजी मांसाहारी खाद्यपदार्थांची चुकीची डिलिव्हरी केल्याबद्दल एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Veg ordered, non-veg sent, huge fine on Zomato, McDonald's; What exactly is the case? | व्हेज ऑर्डर केले, नॉनव्हेज पाठवले, झोमॅटो, मॅकडोनाल्डवर झाला मोठा दंड; नेमकं प्रकरण काय?

व्हेज ऑर्डर केले, नॉनव्हेज पाठवले, झोमॅटो, मॅकडोनाल्डवर झाला मोठा दंड; नेमकं प्रकरण काय?

ऑनलाइन फूड ऑर्डरिंग प्लॅटफॉर्म झोमॅटो आणि रेस्टॉरंट पार्टनर मॅकडोनाल्ड यांना शाकाहारी जेवणाऐवजी मांसाहारी पदार्थ चुकीच्या डिलिव्हरी केल्याबद्दल १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. खटल्याची किंमत म्हणून ५ हजार रुपये अतिरिक्त दंड ठोठावण्यात आला आहे. जोधपूरच्या जिल्हा ग्राहक विवाद निवारण मंचाने दोघांना हा दंड ठोठावला. कंपनी या आदेशाविरोधात अपील दाखल करणार असल्याची माहिती झोमॅटोने शुक्रवारी शेअर बाजाराला दिली. ही ऑर्डर मॅकडोनाल्डद्वारे वितरित करण्यात आली होती. दंड आणि खटल्याची किंमत दोन्ही एकत्रितपणे भरावे लागतील, असे ग्राहक न्यायालयाने म्हटले आहे.

ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो आणि मॅकडोनाल्डला त्यांच्या चुकीमुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे. दंडासोबतच जिल्हा ग्राहकांच्या वतीने न्यायालयीन खर्चासाठी कंपन्यांना स्वतंत्रपणे ५ हजार रुपये भरावे लागतील. न्यायालयाने कंपन्यांना फटकारले आणि सांगितले की, कंपनीचे काम फक्त अन्न पोहोचवण्यापुरते मर्यादित आहे. जेवणात काय आहे आणि काय नाही याची जबाबदारी कंपनीची नाही.

निवडणूक ड्युटी टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून नवनवीन कारणे, 5 दिवसांत आले 500 अर्ज

याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे झोमॅटोचे म्हणणे आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, हे अन्न मॅकडोनाल्डच्या वतीने पाठविण्यात आले होते, त्यामुळे संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळे तो भरण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

Web Title: Veg ordered, non-veg sent, huge fine on Zomato, McDonald's; What exactly is the case?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.