ब्रेडवर आंब्याचं आईस्कीम लावून विकतोय हा, रेसिपी पाहुन नेटकऱ्यांच्या तळपायाची आग मस्तकात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 18:36 IST2021-09-20T18:35:19+5:302021-09-20T18:36:19+5:30
ज्यांना खाण्याची आवड आहे ते खाण्याच्या बाबतीत अनेक प्रयोग करतात. पण कधीकधी काही लोक खाद्यपदार्थांवर असे काही प्रयोग करतात, की ते पाहून खाद्यप्रेमीचा पारा चढतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

ब्रेडवर आंब्याचं आईस्कीम लावून विकतोय हा, रेसिपी पाहुन नेटकऱ्यांच्या तळपायाची आग मस्तकात
जगातील प्रत्येकाला चांगलं आणि चमचमीत खायला आवडतं. म्हणूनच वेगवेगळ्या पदार्थांची नावं ऐकताच तोंडाला पाणी सुटतं. ज्यांना खाण्याची आवड आहे ते खाण्याच्या बाबतीत अनेक प्रयोग करतात. पण कधीकधी काही लोक खाद्यपदार्थांवर असे काही प्रयोग करतात, की ते पाहून खाद्यप्रेमीचा पारा चढतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यातील रेसिपी पाहु लोक अक्षरश: वैतागले आहेत.
हा व्हिडीओ गुजरातच्या वडोदऱ्याचा आहे. इथं एक ठेलेवाला ‘मॅंगो डॉली आइस्क्रीम चाट’ बनवताना दिसतो आहे. ३ मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये, हा ठेलेवाला आधी ब्रेडचा साखरेच्या पाकात भिजवलेले तुकडे ठेवतो, त्यावर नारळाचं पाणी टाकतो. मग त्या ब्रेडवर वेगवेगळे सॉस, ड्राय फ्रूट्स आणि शेवटी मॅंगो आइस्क्रीम ठेवतो, पुन्हा ब्रेडचे लहान लहान तुकडे टाकतो.
हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. ज्याला आतापर्यंत लाखो वेळा पाहिलं गेले आहे. खरं तर, प्रत्येकाची स्वतःची वेगळी आवड असते. पण ही रेसिपी सोशल मीडियावर व्हायरल होताच काही लोक ती बनवणाऱ्या व्यक्तीला अक्षरश: बोल लावत आहेत.
कमेंट्स वरुन तरी असं दिसतंय की विचित्र रेसिपी पाहून लोक खूप चिडलेले आहेत. याआधी एका ड्रायफ्रुट डोश्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यांनतर आता या व्हिडीओवर खाद्यप्रेमी चिडलेले दिसत आहेत.