Video - वडापाव गर्लने केलं दुसरं लग्न? मिस्ट्री मॅनसोबत फोटो व्हायरल; नवरा म्हणतो, "जे माझ्या नशिबात..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 13:23 IST2026-02-11T13:21:12+5:302026-02-11T13:23:10+5:30
Vadapav Girl Chandrika Dixit And Yugam Gera : पतीसोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर चंद्रिकाने एका मिस्ट्री मॅनसोबत लग्नाचे फोटो शेअर करून सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे.

Video - वडापाव गर्लने केलं दुसरं लग्न? मिस्ट्री मॅनसोबत फोटो व्हायरल; नवरा म्हणतो, "जे माझ्या नशिबात..."
'वडापाव गर्ल' म्हणून प्रसिद्ध झालेली चंद्रिका दीक्षित सध्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. पतीसोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर चंद्रिकाने एका मिस्ट्री मॅनसोबत लग्नाचे फोटो शेअर करून सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. विवाहित असूनही चंद्रिका अनेक व्हिडिओंमध्ये या मिस्ट्री मॅनसोबत रोमँटिक होताना दिसत आहे. या सर्व प्रकारानंतर आता चंद्रिकाचा पती युगम गेरा याने पत्नीच्या वागण्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मिस्ट्री मॅनसोबत चंद्रिकाची वाढती जवळीक पाहून तिचा पती युगम गेरा याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तो म्हणतो, "जर एखादी मुलगी तुमचा हात सोडून तुमच्यापासून दूर जाऊ इच्छित असेल, तर तिला जाऊ दिलं पाहिजे. कारण ती मनाने खूप आधीच तुमच्यापासून दूर गेलेली असते." या व्हिडिओला त्याने 'जाऊ द्या' असं कॅप्शन दिलं आहे.
हायव्होल्टेज ड्रामा! "...तर पाय तोडेन"; दुकानाच्या एक्सेसवरुन 'वडापाव गर्ल'च्या नवऱ्याची धमकी
"जे माझ्या नशिबात आहे ते माझ्याकडून..."
युगमने दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये आपलं दुःख व्यक्त करताना म्हटलं की, "एक गोष्ट आता समजली आहे, जे माझ्या नशिबात आहे ते माझ्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. पण जे माझ्या नशिबात नाही, ते मी कितीही प्रयत्न केले तरी माझं होऊ शकत नाही." या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं आहे, "जोपर्यंत आयुष्य सुरू आहे, तोपर्यंत ते जगावंच लागेल."
Video - "तुला मी घडवलंय, माझ्याकडे अनेक पुरावे"; वडापाव गर्लच्या आरोपांवर नवऱ्याचा खुलासा
"माझ्याकडेही पुरावे"; वडापाव गर्लच्या नवऱ्याचं 'एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर', ढसाढसा रडत म्हणाली...
लग्नाच्या फोटोंमागचं सत्य
पती युगमसोबत बिनसलेले असतानाच जेव्हा चंद्रिकाने लाल रंगाच्या शालूमध्ये मिस्ट्री मॅनसोबत फोटो शेअर केले, तेव्हा सोशल मीडियावर खळबळ उडाली. नवरीच्या वेशातील चंद्रिका आणि नवरदेवाच्या वेशातील तो तरुण यांचे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल झाले. चाहत्यांना वाटले की तिने दुसरे लग्न केले आहे आणि अनेकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. मात्र नंतर चंद्रिकाने एक व्हिडीओ शेअर करत स्पष्ट केलं की, हे केवळ एका प्रमोशनल फोटोशूटचा भाग होतं.