Video - "तुला मी घडवलंय, माझ्याकडे अनेक पुरावे"; वडापाव गर्लच्या आरोपांवर नवऱ्याचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 17:41 IST2026-02-04T17:41:07+5:302026-02-04T17:41:39+5:30
Vada Pav Girl Chandrika Dixit And Yugam Gera : युगमने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून पत्नीच्या या आरोपांवर आपलं मौन सोडलं आहे.

Video - "तुला मी घडवलंय, माझ्याकडे अनेक पुरावे"; वडापाव गर्लच्या आरोपांवर नवऱ्याचा खुलासा
वडापाव गर्ल उर्फ चंद्रिका दीक्षित पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यात मोठी खळबळ उडाली आहे. चंद्रिकाने तिचा पती युगम गेरा याच्यावर फसवणुकीचा गंभीर आरोप केला आहे. तिने एका 'मिस्ट्री गर्ल'सोबतचे पतीचे फोटो आणि चॅट्सही सार्वजनिक केले. आता युगमने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून पत्नीच्या या आरोपांवर आपलं मौन सोडलं आहे.
युगम गेरा याने इ्न्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला असून त्याला "तुला मी घडवलंय, लक्षात ठेव" असं कॅप्शन दिलं आहे. व्हिडिओमध्ये त्याने कबूल केलं की, त्याच्याकडून चूक झाली आहे, परंतु ही बाब इतकी मोठी नाही जितकी चंद्रिकाने मोठी करून सांगितली आहे. युगमने इशारा देत म्हटलं की, माझ्याकडेही अनेक पुरावे आहेत आणि जर मी ठरवलं तर तो खूप काही करू शकतो, पण तो तसं करणार नाही.
"माझ्याकडेही पुरावे"; वडापाव गर्लच्या नवऱ्याचं 'एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर', ढसाढसा रडत म्हणाली...
ढसाढसा रडतानाचा व्हिडीओ केला शेअर
चंद्रिकाने पतीवर 'चीटिंग'चे आरोप करत इन्स्टाग्रामवर ढसाढसा रडतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. गेल्या दोन महिन्यांपासून ती हे सर्व सहन करत होती, पण आता सहनशक्ती संपल्याने तिने सत्य समोर आणल्याचं सांगितलं. दुसरीकडे, युगमचे म्हणणं आहे की, तो जिममध्ये जास्त वेळ घालवत होता आणि त्यानंतर बाईक राईडवर गेला होता. यामुळे चंद्रिकाला दुर्लक्षित वाटलं आणि त्यांच्यात वादाला सुरुवात झाली.
वडापाव स्टॉलमुळे प्रसिद्ध
हे कपल सुरुवातीला दिल्लीतील वडापाव स्टॉलमुळे प्रसिद्ध झालं होतं. स्टॉल हटवण्यावरून झालेला पोलिसांशी वाद आणि इतर अनेक कारणांमुळे चंद्रिका नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिली आहे. चंद्रिका 'बिग बॉस ओटीटी'मध्ये दिसल्यानंतर तिला खूप प्रसिद्धी मिळाली, तर युगम सहसा कॅमेऱ्यासमोर कमी येतो आणि आपल्या 'फॅट टू फिट' प्रवासाचे व्लॉग्स शेअर करत असतो.