हृदयद्रावक! देवीच्या मंडपात नाचताना अचानक खाली पडला तरुण अन्...; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 15:02 IST2023-10-25T14:59:14+5:302023-10-25T15:02:45+5:30
देवीच्या मंडपात हा तरुण आपल्या मित्रांसोबत डीजेच्या तालावर नाचत असताना अचानक जमिनीवर पडला.

फोटो - hindi.news18
तरुणाच्या मृत्यूचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. गावातील देवीच्या मंडपात हा तरुण आपल्या मित्रांसोबत डीजेच्या तालावर नाचत असताना अचानक जमिनीवर पडला. तो तरुण पडताना पाहून त्याच्यासोबत नाचणाऱ्या त्याच्या मित्रांनी त्याला उचलण्याचा प्रयत्न केला. यानंतर तरुण बेशुद्ध असल्याचं पाहून स्थानिक लोकांनी त्याला जिल्हा रुग्णालयात नेलं. तिथे डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले. डॉक्टरांनी त्याला हार्ट अटॅक आल्याचं म्हटलं आहे.
मुलायम राजभर असं या तरुणांचं नाव असून तो आपल्या मित्रांसोबत डान्स करत होता. त्यावेळी उपस्थित असलेले काही लोक याचा व्हि़डीओ बनवत होते. याच दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाचा जमिनीवर पडून मृत्यू झाल्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला. तरुणाच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ अकबरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील लोरपूर वॉर्डमधील आहे.
मुलायम राजभर याचे वडील धर्मराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मुलाला कोणतीही समस्या नव्हती. दिवसा शेताला पाणी दिल्यानंतर संध्याकाळी परत येऊन तो देवीच्या मंडपात गेला होता. तिथेही त्याची प्रकृती अजिबात खराब नव्हती, पण तो अचानक खाली पडला आणि पुन्हा उठू शकला नाही.
नाचताना जमिनीवर पडल्यानंतर झालेल्या मृत्यूबाबत डॉ. सुरेंद्र राजभर सांगतात की, अशी प्रकरणे समोर येत आहेत. परंतु, जेव्हा रुग्ण डॉक्टरांकडे येतात तेव्हा ते जिवंत नसल्यामुळे मृत्यूचे कारण सांगणे कठीण होते. परंतु, हार्ट अटॅकने असे मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.