धावत्या बाईकवर UPSC चा अभ्यास; Zomato डिलिव्हरी बॉयचा VIDEO व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 16:03 IST2024-03-31T16:02:59+5:302024-03-31T16:03:29+5:30
या डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ पाहून नेटकरी त्याचे कौतुक करत आहेत.

धावत्या बाईकवर UPSC चा अभ्यास; Zomato डिलिव्हरी बॉयचा VIDEO व्हायरल...
viral video: देशातील हजारो मुलं-मुली दरवर्षी UPSC सारख्या स्पर्धा परीक्षा देतात. यातील मोजकेच परीक्षा पास होतात. अशा अनेक मुलांची आपण उदाहरणे पाहिली असतील, ज्यांनी अतिशय गरिबीतून यशाचे शिखर गाठले आहे. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक झोमॅटो डिलिव्हरी बॉय चक्क बाईकवर युपीएससीचा अभ्यास करताना दिसतोय.
असे म्हणतात की, पराभूत तोच असतो, जो आपला पराभव स्विकारतो. पण, पुन्हा जिद्दीने प्रयत्न करणारा कधीच पराभूत होत नाही. आयुष्यात कधी कधी जिंकण्यापेक्षा जास्त महत्वाचे प्रयत्न असतात. तुमचे प्रयत्नच तुम्हाला एक ना एक दिवशी यशस्वी माणूस बनवतात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ पाहून तुम्हीही त्याचे कौतुक कराल आणि प्रेरित व्हाल.
पाहा video:-
After Watching this video, I Don't Think you Have any Other Motivation to Study Hard#UPSC#Motivationpic.twitter.com/BPykMKBsua
— Ayussh Sanghi (@ayusshsanghi) March 29, 2024
व्हिडिओमध्ये झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेला दिसतोय, यावेळी इतर टाईमपास करण्याऐवजी तो मोबाईलमध्ये UPSC लेक्चर पाहताना दिसतोय. UPSC व्याख्याते आयुष संघी यांनी 29 मार्च रोजी हा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओला 68 हजारांहून अधिक व्ह्यू मिळाले आहेत, तर अनेकजण यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. नेटकरी त्या व्यक्तीचे तोंडभरुन कौतुक करताना दिसत आहेत.