Unlock 1 चॅलेंज! या फोटोमधील 'मनीमाऊ'ला शोधून दाखवा; भलेभले थकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 11:04 IST2020-06-09T11:02:52+5:302020-06-09T11:04:55+5:30

या फोटोमध्ये एक मांजर लपलेले आहे. त्या मांजराला तुम्ही शोधायचे आहे. जर या मांजराला शोधण्यात अपयशी ठरलात तर तुम्ही हरलात असे समजावे.

Unlock 1 Challenge! Find the cat in this photo; powerful man's tired | Unlock 1 चॅलेंज! या फोटोमधील 'मनीमाऊ'ला शोधून दाखवा; भलेभले थकले

Unlock 1 चॅलेंज! या फोटोमधील 'मनीमाऊ'ला शोधून दाखवा; भलेभले थकले

सध्या लॉकडाऊनमुळे थकवा आला असेल. मनाला, शरीराला, डोळ्यांना. पण असे काहीतरी उत्सुकता ताणणारे सापडल्यास हा थकवा दूर निघून जातो. आम्ही असेच एक भन्नाट चॅलेंज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यासाठी हा फोटो निरखून पहा. तुम्हाला लपलेली मांजर सापडते का?


या फोटोमध्ये एक मांजर लपलेले आहे. त्या मांजराला तुम्ही शोधायचे आहे. जर या मांजराला शोधण्यात अपयशी ठरलात तर तुम्ही हरलात असे समजावे. अनेकांना चॅलेंज खूप आवडते. पण लक्षात घ्या या फोटोमधील मांजर शोधणे म्हणजे मातीतून सुई शोधण्यासारखे आहे बरं का. 


तुम्हाला आठवतंय का की, काही गोष्टी आपल्या नजरेसमोर असूनही दिसत नाहीत. तुमच्या घरात असे नेहमी घडते. मग बायको, नवरा, भाऊ, आई-बाबांना विचारणा सुरु होते. बऱ्याचदा तर चष्मा डोक्यावर असतो पण तो दुसराच व्यक्ती शोधून देतो. सध्या तर मोबाईल कुठेही ठेवला तर तो शोधण्यात वेळ जात आहे. चला तर मग आता या फोटोतील लपलेले मांजर शोधून दाखवा. 



नाही शोधता आले का? ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. आम्ही तुम्हाला मदत करणारच आहोत. एवढे हिरमसून जाऊ नकात. खरेतर हे मांजर या फोटोत दिसतच नाहीय. पण तिचे केवळ पाय या फोटोत दिसत आहेत. हे मांजर टीव्हीच्या मागे झोपलेले आहे. हा फोटो पहा...

अन्य महत्वाच्या बातम्या...

चिंताजनक! कोरोनाचा दररोजचा आकडा १०००० समीप; आज 331 बळींची नोंद

अर्नब गोस्वामींच्या अडचणींत वाढ; मुंबई पोलिसांकडून उद्या पुन्हा चौकशी

दक्षिण कोरियाच्या विश्वासघातामुळे तणाव; किम जोंग उनने घेतला मोठा निर्णय

बिहारनंतर बंगाल; अमित शहांच्या व्हर्च्युअल रॅलीने ममता बॅनर्जी तणावात

आजचे राशीभविष्य - 9 जून 2020; कन्या राशीच्या लोकांना प्रिय व्यक्ती भेटेल

Web Title: Unlock 1 Challenge! Find the cat in this photo; powerful man's tired