चिंताजनक! कोरोनाचा दररोजचा आकडा १०००० समीप; आज 331 बळींची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 10:35 AM2020-06-09T10:35:46+5:302020-06-09T10:39:39+5:30

तीन जूनला देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा जवळपास २ लाख ७ हजार ६१५ होता.

CoronaVirus Marathi news daily figure is close to 10,000; 331 deaths today | चिंताजनक! कोरोनाचा दररोजचा आकडा १०००० समीप; आज 331 बळींची नोंद

चिंताजनक! कोरोनाचा दररोजचा आकडा १०००० समीप; आज 331 बळींची नोंद

Next

नवी दिल्ली : देशात गेले अडीज महिने लॉकडाऊन करूनही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. आज नव्या कोरोना ग्रस्तांचा आकडा देशाच्या चिंतेत वाढ करणारा आहे. १०००० चा टप्पा पार करण्यासाठी अवघे काही आकडेच कमी पडले आहेत. 


देशभरात गेल्या २४ तासांत सर्वाधिक म्हणजे 9987 नवे कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. तर ३३१ बळींची नोंद झाली आहे. देशातील एकूण आकडा 266598 वर गेला असून सध्या 129917 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 7466 लोकांचा मृत्यू झाला आहे. 


तीन जूनला देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा जवळपास २ लाख ७ हजार ६१५ होता. जो ४ जूनला वाढून २.१६ लाख झाला. तर ५ जूनला २.२६ वर गेला. ६ जूनला हा आकडा २.३६ लाख आणि ७ जूनला हा आकडा २.४६ लाखांवर गेला. जरी १०००० चा आकडा दररोज पार केला नसला तरीही सरासरी ही ९५०० च्या वर राहिल्याने आता दुपारपर्यंतचा आकडा हा एकूण ५०००० च्या आसपास गेला आहे. सोमवारी ९९८३ नवीन रुग्ण सापडले होते.




५० हजाराचा टप्पा वेगवान
देशात कोरोनाचा पहिला रुग्ण ३० जानेवारीला समोर आला होता. तर ७ मे रोजी कोरोना रुग्णांचा आकडा ५०००० पार झाला होता. म्हणजेच पहिला ५०००० चा टप्पा ओलांडण्यासाठी ९६ दिवस लागले होते. यामध्ये लॉकडाऊन लावण्यात आला होता. मात्र, १९ मे ला कोरोना रुग्णांचा आकडा १ लाखांवर गेला होता. हा वेग दिवसागणिक कमालीचा वाढत गेला आणि २७ मे रोजी हा आकडा १.५० लाखांवर पोहोचला. ३ जूनला ही संख्या दोन लाखांवर गेली होती.  

अन्य महत्वाच्या बातम्या...

अर्नब गोस्वामींच्या अडचणींत वाढ; मुंबई पोलिसांकडून उद्या पुन्हा चौकशी

दक्षिण कोरियाच्या विश्वासघातामुळे तणाव; किम जोंग उनने घेतला मोठा निर्णय

बिहारनंतर बंगाल; अमित शहांच्या व्हर्च्युअल रॅलीने ममता बॅनर्जी तणावात

आजचे राशीभविष्य - 9 जून 2020; कन्या राशीच्या लोकांना प्रिय व्यक्ती भेटेल

Web Title: CoronaVirus Marathi news daily figure is close to 10,000; 331 deaths today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.