अनोखी कार; 1-2 रुपयांच्या नाण्यांनी भरली कार, व्हिडिओ पाहून लोकांनी दिल्या अशा प्रतिक्रिया...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 14:29 IST2023-04-19T14:24:47+5:302023-04-19T14:29:54+5:30
सोशल मीडियावर या कॉइन कारचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

अनोखी कार; 1-2 रुपयांच्या नाण्यांनी भरली कार, व्हिडिओ पाहून लोकांनी दिल्या अशा प्रतिक्रिया...
जगभरात असे काही लोक आहेत, जे इतर कोणी कल्पनाही करू शकणार नाही, असे विचित्र प्रयोग करत असतात. एका तरुणाने त्याच्या कारसोबत केलेला प्रयोग सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याने त्याच्या कारला एक वेगळाच लूक दिला, ज्यामुळे हा व्हिडिओही लोकांना खूप आवडत आहे.
vishal_experimentking या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने आपल्या संपूर्ण कारवर ₹ 1-2 ची नाणी चिकटवल्याचे दिसत आहे. त्याने कारचा एकही भाग असा ठेवला नाही, ज्यावर कॉइन चिकटवलेला नसेल. कॉइन चिकटवल्यामुळे त्याची कार सिल्व्हर दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी या कारचे नाव कॉईन कार असे ठेवले. व्हिडिओवर एका युजरने कमेंट केली की, 'आता मला समजले की दुकानात ₹ 1 ची नाणी का उपलब्ध नाहीत. सगळी नाणी याने कारवर बसवली आहेत.' दुसऱ्या एका युजरने लिहिले- 'भाई, तू तर बुलेटप्रूफ गाडी बनवली आहेस. आणखी एकाने कारला 'मनी प्रूफ कार' म्हटले.