खतरनाक! Gym मध्ये दोन महिलांची फ्री स्टाईल फाइट, केस ओढून हाणामारी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 11:27 IST2022-10-12T11:26:07+5:302022-10-12T11:27:58+5:30

Gym Women Fight Video: एका जिममधील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात दोन महिला जिममध्ये मारामारी करताना दिसत आहेत. त्यांच्यात भांडण का झालं हे तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यावरच समजेल.

Two women fight in gym over equipment cctv footage viral | खतरनाक! Gym मध्ये दोन महिलांची फ्री स्टाईल फाइट, केस ओढून हाणामारी...

खतरनाक! Gym मध्ये दोन महिलांची फ्री स्टाईल फाइट, केस ओढून हाणामारी...

Gym Women Fight Video: लोक जिममध्ये सामान्यपणे एक्सरसाइज करण्यासाठी जातात. पण इथेही काही लोकांची भांडणे होतात. जिमिंग करता करता लोकांचा ईगो हर्ट होतो. मग त्यांच्यात भांडण होतं. सोशल मीडियावर अशा भांडणांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. एका जिममधील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात दोन महिला जिममध्ये मारामारी करताना दिसत आहेत. त्यांच्यात भांडण का झालं हे तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यावरच समजेल.

सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेल्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, दोन महिलांमध्ये इक्विप्मेंटवरून भांडण झालं. बघू शकता की, जिममध्ये एक महिला बऱ्याच वेळपासून वेटलिफ्टिंग मशीनसाठी तिचा नंबर येण्याची वाट बघत होती. जेव्हा तिची वेळ येत तेव्हा एक तिसरीच महिला मधेच येऊन मशीन घेते. अशात जी महिला वाट बघत होती ती संतापली. अशात दोन महिलांमध्ये बाचाबाची होती आणि मग मारामारी.

या महिलांचा वाद इतका वाढतो की, नंतर त्या एकमेकींना मारतात आणि मग एकमेकींचे केसही ओढू लागतात. त्यानंतर जिममधील इतर महिला दोघींचं भांडण सोडवण्यासाठी येतात. या व्हिडीओवर सोशल मीडियावर यूजरकडून अनेक मजेदार कमेंट्स येत आहेत. 
 

Web Title: Two women fight in gym over equipment cctv footage viral