दोन अल्पवयीन मुलांनी विमान पळवत घेतली भरारी, अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 14:38 IST2018-11-28T14:37:37+5:302018-11-28T14:38:55+5:30
दुचाकी किंवा चारचाकी गाड्या चोरीला गेल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. पण कधी विमान चोरी गेल्याचं ऐकलंय का? नाही ना?

दोन अल्पवयीन मुलांनी विमान पळवत घेतली भरारी, अन्...
दुचाकी किंवा चारचाकी गाड्या चोरीला गेल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. पण कधी विमान चोरी गेल्याचं ऐकलंय का? नाही ना? आज आम्ही तुम्हाला एका विमान चोरीची घटना सांगणार आहोत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे विमान दोन अल्पवयीन मुलांनी चोरी केलं.
अमेरिकेतील उटाह शहरात दोन मुलांना विमान चोरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पण हे पॅसेंजर विमान नव्हतं. हे एक छोटं विमान होतं. या घटनेच्या साधारण ८ तासांनंतर अधिकाऱ्यांनी एक माहिती जारी केली आहे. त्यात या विमान चोरीबाबत सांगण्यात आलं आहे.
या घटनेनंतर जेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासलं जातं होतं, तेव्हा सगळं सत्य बाहेर आलं. यात एक १४ वर्षांचा आणि १५ वर्षांचा मुलगा विमान चोरी करताना दिसले. इतक्या लहान मुलांनी हे विमान उडवत नेलं कसं याचा सर्वांनाच प्रश्न पडला होता.
पोलीस आणि तपास अधिकारी यांच्यानुसार, हे दोन्ही मुलं ट्रॅक्टरकडे न जाता विमानाकडे गेले. इथे त्यांनी सिंगल इंजिन असलेलं एअरक्राफ्ट चोरी केलं आणि उडवून नेलं. काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, या मुलांनी विमान चोरी केलं आणि एका मोठ्या विमाना खालून उडवत एकाएकी नजरेसमोरुन दूर झाले.
तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, या मुलांनी चोरी केलेलं विमान वर्नल एअरपोर्टवर लॅंड केलं होतं. या घटनेची संपूर्ण माहिती सोशल मीडियात शेअर केली गेली. या घटनेने सगळीकडे एक आश्चर्य व्यक्ती केलं जात आहे की, इतक्या कमी वयात या मुलांनी विमान उडवलं कसं.