दोन वृद्ध महिला रस्त्यातच एकमेकींवर तुटुन पडल्या, फ्री स्टाईल हाणामारी बघुन हसू आवरणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 15:22 IST2021-10-22T15:22:21+5:302021-10-22T15:22:31+5:30

महिलांची भांडण होतात तेव्हा जास्तीत जास्त शाब्दिक बाचाबाची पाहायला मिळते. पण आता जो व्हिडिओ तुम्ही पाहणार आहात त्या दोन वृद्ध महिला एकमेकींसोबत चांगल्याच भिडल्या. त्यांनी अशी काही फ्री स्टाईल हाणामारी केली की तुम्ही पोट धरुन हसाल.

two old women fighting with each other funny video goes viral | दोन वृद्ध महिला रस्त्यातच एकमेकींवर तुटुन पडल्या, फ्री स्टाईल हाणामारी बघुन हसू आवरणार नाही

दोन वृद्ध महिला रस्त्यातच एकमेकींवर तुटुन पडल्या, फ्री स्टाईल हाणामारी बघुन हसू आवरणार नाही

गाव म्हटलं की भांडण आलीच. त्यात पाण्यावरुन होणारी महिलांची भांडण म्हणजे गावकऱ्यांचे फुकटचे मनोरंजन. पण महिलांची भांडण होतात तेव्हा जास्तीत जास्त शाब्दिक बाचाबाची पाहायला मिळते. पण आता जो व्हिडिओ तुम्ही पाहणार आहात त्या दोन वृद्ध महिला एकमेकींसोबत चांगल्याच भिडल्या. त्यांनी अशी काही फ्री स्टाईल हाणामारी केली की तुम्ही पोट धरुन हसाल.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दोन वृद्ध महिला एकमेकींशी तुफान मारामारी करत आहेत.  व्हिडीओच्या सुरवातीला दोन वृद्ध महिलांमध्ये कोणाता तरी वाद सुरू आहे. काही वेळातच प्रकरण तापले आणि हाणामारी सुरू होते. दोन्ही स्त्रिया एकमेकांचे केस पकडतात फिल्मी स्टाईलमध्ये मरामारी सुरु करतात.

हा व्हिडीओ सोशल मीडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ funnyvideos1377 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे . हा व्हिडीओ अत्तापर्यत हजारो लोकांनी पाहीला आहे. अनेक यूजर्सनी त्यावर कमेंटसुद्धा केल्या आहेत. ‘कोणीतरी या महिलांना WWE ला पाठवा’ अशी भन्नाट कमेंटही एका युजरने केली आहे.

Web Title: two old women fighting with each other funny video goes viral