मोदीजी, आम्ही बलिदान देण्यास तयार; चिमुरड्यांचा धमाल व्हिडीओ पाहून आवरणार नाही हसू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 01:43 PM2021-06-05T13:43:00+5:302021-06-05T13:43:28+5:30

दोन लहानग्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

two little boy big appeal to pm modi for coronavirus video goes to viral | मोदीजी, आम्ही बलिदान देण्यास तयार; चिमुरड्यांचा धमाल व्हिडीओ पाहून आवरणार नाही हसू

मोदीजी, आम्ही बलिदान देण्यास तयार; चिमुरड्यांचा धमाल व्हिडीओ पाहून आवरणार नाही हसू

Next

संपूर्ण जगात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. भारतात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली असताना आता तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक ठिकाणी कठोर निर्बंध लागू आहेत. काही राज्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. शाळा, महाविद्यालयं कित्येक महिन्यांपासून बंद आहेत. परीक्षादेखील रद्द करण्यात आल्या आहेत. याच कालावधीत सोशल मीडियावर अनेक व्हिडीओदेखील व्हायरल झाले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं बंद आहेत. ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. बऱ्याच राज्यांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी खूष आहेत. त्याच पार्श्वभूमीवर दोन चिमुरड्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 'कोरोनाविरुद्धच्या लढाईत आम्ही आमच्या शिक्षणाचं बलिदान देण्यास तयार आहोत,' असं ही दोन मुलं म्हणत आहेत. एका मुलानं तर कहरच केला आहे. पंतप्रधान मोदीजी, सात वर्षे शाळा बंद ठेवाव्या लागल्चा तरी लागल्या तरी आम्हाला कोणतीही अडचण नाही, असं एकानं म्हटलं आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओची जोरदार चर्चा आहे.



मुलांचा व्हिडीओ अनेकांना हसू अनावर झालं आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. ट्विटरवर भय्याजी नावाच्या अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हजारो लोकांनी आतापर्यंत हा व्हिडीओ पाहिला आहे. या चिमुरड्यांच्या व्हिडीओवर अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.

Read in English

Web Title: two little boy big appeal to pm modi for coronavirus video goes to viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.