एका सिंहिणीसाठी आपापसात भिडले दोन सिंह, लढाईचा शेवट आहे धक्कादायक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 18:54 IST2022-08-25T18:52:25+5:302022-08-25T18:54:36+5:30

दोन्ही सिंह इतके शक्तीशाली आहेत की, यांच्या लढाईचा शेवट कसा होईल? आणि यामध्ये नक्की कोण जिंकेल अशीच उत्सुक्ता लोकांना लागली आहे.

two lion fighting for lioness video goes viral on social media | एका सिंहिणीसाठी आपापसात भिडले दोन सिंह, लढाईचा शेवट आहे धक्कादायक!

एका सिंहिणीसाठी आपापसात भिडले दोन सिंह, लढाईचा शेवट आहे धक्कादायक!

सिंहाला 'जंगलाचा राजा' म्हणतात. हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. तसे पाहाता सिंह हे कळपात राहाता आणि ते सहसा एकमेकांवर हल्ला करत नाहीत.  सोशल मीडियावर यासंदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये दोन सिंह हे एका सिंहिणीला मिळवण्यासाठी एकमेकांशी लढत आहेत. तसे पाहाता सोशल मीडियावर आपल्याला अनेक वाईल्ड लाईफ व्हिडीओ पाहायला मिळतात. परंतु हा व्हिडीओ थक्कं करणारं आहे. कारण यामध्ये दोन शक्तीशाली सिंह लढत आहेत. हे दोन्ही सिंह इतके शक्तीशाली आहेत की, यांच्या लढाईचा शेवट कसा होईल? आणि यामध्ये नक्की कोण जिंकेल अशीच उत्सुक्ता लोकांना लागली आहे.

या व्हिडीओत हे स्पष्ट लक्षात येत आहे की, दोन्ही ही सिंह मागे हटण्यासाठी तयार नाही. ते एकमेकांवर आपल्या पंजाने वार करत आहेत, या व्हिडीओत तुहाला सिंहीणी देखील दिसेल, जिच्यासाठी हे दोघेही लढत आहेत. पुढे या व्हिडीओत असं देखील पाहू शकता की, ही सिंहीण एका सिंहाला थांबवण्याचा आणि मागून चावण्याचा प्रयत्न करत आहे. ही लढाई सुमारे 60 सेकंद चालली. परंतु तरी देखील याचा कोणताही निकाल लागला नाही. परंतु सिंहीणीच्या या वागण्यावरुन तरी असंत दिसत आहे की, तिनं ठरवलं आहे की, तिला आता कोणत्या सिंहाकडे जायचं आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर lionsofafrica_ नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी शेअर केलेला हा व्हिडीओ लाखो वेळा पाहिला गेला आहे.

Web Title: two lion fighting for lioness video goes viral on social media