'मेरे प्यार का रस जरा चखना'! गोविंदाच्या गाण्यावर दोन मुलींचा तुफान डान्स; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 16:52 IST2022-06-02T16:51:20+5:302022-06-02T16:52:07+5:30
Girls Dance Video : या व्हिडिओमध्ये दोन्ही मुली अगदी गोविंदाच्याच शैलित डान्स करताना आणि त्याच्या सारखेच एक्सप्रेशन्स देताना दिसत आहेत.

'मेरे प्यार का रस जरा चखना'! गोविंदाच्या गाण्यावर दोन मुलींचा तुफान डान्स; Video व्हायरल
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि कॉमेडी किंग गोविंदा यांची भूमिका असलेला, 1998 च्या 'बडे मियाँ, छोटे मियाँ' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. चित्रपटातील या जोडीला चाहत्यांची जबरदस्त पसंती मिळाली होती. या चित्रपटातील 'मेरे प्यार का रस जरा चखना, ओये मखना' हे गाणे प्रचंड प्रसिद्ध झाले होते. एवढेच नाही, तर या गाण्यातील गोविंदाच्या स्टेप्स आजही लोकांच्या स्मरणात आहेत.
दोन मुलींचा गोविंदा स्टाईल डान्स -
या गाण्यावर डान्स करतानाचा दोन मुलींचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. व्हिडिओतील मुलींचा डान्स एवढा जबरदस्त आहे, की तो पाहून लोकांना थेट चित्रपटातील गोविंदाच्याच डान्सची आठवण येत आहे. या व्हिडिओत दोन्ही मुली गोविंदा स्टाईलमध्ये जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. या जान्समुळे या दोन्ही मुली रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत.
या व्हिडिओमध्ये दोन्ही मुली अगदी गोविंदाच्याच शैलित डान्स करताना आणि त्याच्या सारखेच एक्सप्रेशन्स देताना दिसत आहेत. हा व्हिडिओ indianfamousdancers नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. तसेच या व्हिडिओला, 'अमेजिंग डान्स परफॉर्मेन्स,' असे कॅप्शनही देण्यात आले आहे. सोशल मीडियावर हा डान्स प्रचंड व्हायरल होत आहे.