Video : २ फूटाच्या नवरदेवाची ६ फूट उंच सुंदर नवरी, व्हायरल झाला लग्नाचा व्हिडीओ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 12:59 IST2019-11-27T12:55:04+5:302019-11-27T12:59:44+5:30

आपण अनेकांना हे बोलताना ऐकत असतो की, दोन व्यक्तींची जोडी ही देवाने तयार केली असते. कोणत्याही नात्यात हे गरजेचं नाही की, समोरच्या व्यक्तीसारखंच तुम्ही सुंदर असावं.

Two feet tall Pakistani man bobo get six feet tall bride video viral | Video : २ फूटाच्या नवरदेवाची ६ फूट उंच सुंदर नवरी, व्हायरल झाला लग्नाचा व्हिडीओ 

Video : २ फूटाच्या नवरदेवाची ६ फूट उंच सुंदर नवरी, व्हायरल झाला लग्नाचा व्हिडीओ 

आपण अनेकांना हे बोलताना ऐकत असतो की, दोन व्यक्तींची जोडी ही देवाने तयार केली असते. कोणत्याही नात्यात हे गरजेचं नाही की, समोरच्या व्यक्तीसारखंच तुम्ही सुंदर असावं. अनेकदा असं बघायला मिळतं की, मुलांच्या तुलनेत मुली अधिक सुंदर असतात किंवा मुलींच्या तुलनेत मुलगा सुंदर असतो. याच विषयावरून सोशल मीडियात एका लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. या अनोख्या आणि शानदार लग्नातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात बघायला मिळत आहे की, २ फूट उंची असलेल्या नवरदेवाला ६ फूट उंच सुंदर नवरी मिळाली.

पाकिस्तानच्या बुरहान चिश्तीची उंची २ फूट इतकी आहे. त्यांचं लग्न ६ फूट उंच फौजियासोबत पार पडलं. सर्वात खास बाब ही आहे की, हे अरेंज मॅरेज नसून लव्ह मॅरेज आहे. त्यामुळे लोकांना आणखीच आश्चर्याचा धक्का बसलाय. हे लग्न मोठ्या थाटात नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे पार पडलं. ज्यात १३ देशांच्या लोकांनी सहभाग घेतला होता.

चिश्तीला लोक प्रेमाने बोबो असं म्हणतात. त्यांना पोलिओ झाला होता आणि ते बालपणापासून ओस्लोमध्ये राहतात. बोबो नॉर्वेमध्ये अभिनेता सलमान खानच्या बीइंग ह्यूमन कॅम्पेनचं प्रतिनिधीत्वही करतात.

बुरहान चिश्ती यांनी २०१७ मध्ये मोस्ट इंस्पिरेशनल मॅन असा पुरस्कारही मिळाला आहे. तर फौजिया पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील राहणारी आहे. बोबो हे बालपणी पोलिओचे शिकार झाले होते. त्यानंतर ते व्हीलचेअरवरच अधिक वेळ राहू लागले. मात्र, तरी सुद्धा ते एक दिलखुलास व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात.

बुरहान चिश्ती जेव्हाही एखाद्या सेलिब्रिटीला भेटतात तेव्हा त्यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियात शेअर करायला विसरत नाहीत. नॉर्वेची राजधानी ओस्लोमध्ये धडाक्यात हे लग्न झालं असून या लग्नातील त्यांचा डान्स व्हिडीओ समोर आला आहे.


Web Title: Two feet tall Pakistani man bobo get six feet tall bride video viral