Video : दोन तरूणींचा टिकटॉकवर धुमाकूळ, दोघींची स्टाइल अन् निराळी अदा बघून तुम्हीही व्हाल फिदा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 13:04 IST2019-08-29T13:02:51+5:302019-08-29T13:04:35+5:30
चीनच्या दोन मुलींचे टिकटॉक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. या दोघींची लोकप्रियता केवळ चीनमध्येच नाही तर संपूर्ण जगभरात आहे.

Video : दोन तरूणींचा टिकटॉकवर धुमाकूळ, दोघींची स्टाइल अन् निराळी अदा बघून तुम्हीही व्हाल फिदा!
सध्या सोशल मीडियात टिकटॉकच्या व्हिडीओंचा चांगलाच बोलबाला असतो. अनेकांना आपलं टॅलेंट दाखवण्यासाठी हा एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाल्याचं बोललं जातं. पण काही वाईटही घटना या माध्यमातून समोर आल्या होत्या. असो, अशातच चीनच्या दोन मुलींचे टिकटॉक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. या दोघींची लोकप्रियता केवळ चीनमध्येच नाही तर संपूर्ण जगभरात आहे. या दोन्ही तरूणी त्यांच्या अफलातून एक्स्प्रेशनच्या जोरावर आणि खास अदांमुळे तरूणांच्या मनात घर करून आहेत.
टिकटॉकवर एक Loora8888 नावाने यांचं अकाऊंट आहे. काही व्हिडीओंमध्ये दोघी असतात तर काहींमध्ये एकच तरूणी असते. पण त्यांच्या स्टाइलने अनेकजण घायाळ झाले आहेत. यातील लहान केस असलेल्या मुलीला लोक क्रश सांगत आहेत. या तरूणीचं नाव Loora Wang असं आहे.
टिकटॉकवर या तरूणीचे १० हजारांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. टिकटॉकवर इतके फॉलोअर्स असणं मोठी गोष्टी आहे. तर चीनचं एक वेगळं टिकटॉक आहे, ज्याला Douyin असं म्हटलं जातं. यावर तर त्यांचे अडीच लाख फॉलोअर्स आहेत.