अरे बापरे! उत्साहाच्या भरात मॉडेलने घेतला किस, जीभच तुटली, तरुणीने सांगितली आपबिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 19:49 IST2023-01-13T19:43:41+5:302023-01-13T19:49:03+5:30
आपण आपल्या आयुष्यातलं पहिलं प्रेम आणि पहिला किस कुणीही कधीच विसरू शकत नाही. ही भावना आपल्या आठवणींमध्ये नेहमीच ताजी असते.

अरे बापरे! उत्साहाच्या भरात मॉडेलने घेतला किस, जीभच तुटली, तरुणीने सांगितली आपबिती
आपण आपल्या आयुष्यातलं पहिलं प्रेम आणि पहिला किस कुणीही कधीच विसरू शकत नाही. ही भावना आपल्या आठवणींमध्ये नेहमीच ताजी असते. 'फर्स्ट किस'ची क्रेझ, रोमँटिसिझम आणि थ्रिल समजावून सांगते. पण ही क्रेझ तुर्की येथील मॉडेलसाठी तोट्याची ठरली आहे. उत्साहाच्या भरात तिच्या पार्टनरने असा किस घेतला की त्या मॉडेलची जीभच तुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
यानंतर तातडीने त्या मॉडेलला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लगेचच मॉडेलवर शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. हे प्रकरण तिने इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
34 वर्षीय तुर्की मॉडेल सेदा एरसोय सेडा एरसोयने हॉस्पिटलमधून सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात तिने सर्व घटना सांगितली आहे. ती पहिल्या डेटला गेली होती. दरम्यान, तिच्या जोडीदाराने उत्साहाच्या भरातकिस घेतला. यावेळी तिच्या जीभ तुटली गेली. यावेळी मला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती मॉडेलने दिली आहे. 'कदाचित मी पहिली व्यक्ती आहे जिची किस दरम्यान जीभ तुटली, असंही तिने म्हटले आहे.
एका अहवालानुसार, एरसोयने तिच्या चाहत्यांचे आभार मानले , "मित्रांनो, मी आता ठीक आहे, तुमच्या शुभेच्छांबद्दल तुमचे खूप खूप आभार." कोणतीही गुंतागुंत न होता ऑपरेशन पूर्ण झाले आणि डॉक्टरांनी जिभेला टाके लावले. काही दिवस आराम करण्यास सांगितले आहे, असंही तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.
Video - जबरदस्त! कचऱ्यापासून बनवला अप्रतिम ड्रेस; Miss Universe च्या रॅम्पवर अवतरली सुंदरा
' त्याला बहुतेक फ्रेंच किस कसा करायचा याची माहिती नव्हती. त्यामुळेच गडबड झाली. मला असे वाटते की मी त्याला फारसे ओळखत नाही कारण आम्ही पहिल्यांदा भेटून फक्त एक महिना झाला आहे, असंही तिने पुढे म्हटले आहे. यावेळी काही युझरांनी त्या मॉडेलला प्रश्नही केले आहेत.
सेडा एरसोय ही तुर्कीची मॉडेल आहे आणि ती तुर्की 2010 च्या मिस फोटोमॉडेल स्पर्धेची विजेती आहे. इंस्टाग्रामवर तिचे 620,000 फॉलोअर्स आहेत. तिची बहीण इसरा देखील एक इंस्टाग्राम स्टार आहे. तिचे 398,000 फॉलोअर्स आहेत. सेडाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.