Video - जबरदस्त! कचऱ्यापासून बनवला अप्रतिम ड्रेस; Miss Universe च्या रॅम्पवर अवतरली सुंदरा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 07:07 PM2023-01-13T19:07:26+5:302023-01-13T19:16:50+5:30

हिऱ्यासारखा चमकणारा तिचा ड्रेस गोल्ड किंवा सिल्व्हरच्या तारांनी सजलेला नव्हता, तर चक्क कचऱ्यातून तयार करण्यात आला होता.

miss thailand look went viral after she participate in miss universe 2023 with can pull tab dress | Video - जबरदस्त! कचऱ्यापासून बनवला अप्रतिम ड्रेस; Miss Universe च्या रॅम्पवर अवतरली सुंदरा

Video - जबरदस्त! कचऱ्यापासून बनवला अप्रतिम ड्रेस; Miss Universe च्या रॅम्पवर अवतरली सुंदरा

googlenewsNext

मिस युनिव्हर्स 2023 च्या एका इव्हेंटदरम्यान मिस थायलंड 2022 एना सुएंगमने  (Anna Sueangam) एक सुंदर ड्रेस परिधान करून रॅम्प वॉक केला ज्यामुळे सर्वजण थक्क झाले. खरं तर हिऱ्यासारखा चमकणारा तिचा ड्रेस गोल्ड किंवा सिल्व्हरच्या तारांनी सजलेला नव्हता, तर चक्क कचऱ्यातून तयार करण्यात आला होता. सोशल मीडियावर मिस थायलँडच्या लूकची तुफान चर्चा रंगली असून सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. 

मिस थायलंडचा ड्रेस पाहून सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे. कॅनच्या पूल टॅबपासून बनवलेल्या झगमगत्या ड्रेसमध्ये एना खूपच सुंदर दिसत होती. मात्र पूल टॅबच्या मधोमध स्वरोव्स्की हिरेही होते, जे ड्रेसमध्ये आणखी सुंदर बनवत होते. कचऱ्याचा पुनर्वापर करून तयार केलेला हा ड्रेस पाहून काही लोकांनी मिस थायलंडला ‘गार्बेज ब्युटी क्वीन’ असंही म्हटलं. मात्र, या गोष्टीने आता एनाला काहीही फरक पडत नाहीत.

एनाचे वडील कचरावेचक आहेत, तर आई रस्ता साफ करून घर चालवते. लोकांच्या कमेंटवर एना म्हणते की, कोणत्या घरात आपला जन्म कसा झाला याचा विचार करण्यापेक्षा नशीब बदलण्याची ताकद तुमच्यात आहे या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करा. बहुतांश युजर्सनी एनाच्या लूकचं जोरदार कौतुक केलं आहे. यासोबतच अनोख्या पद्धतीने पालकांना ट्रिब्यूट दिल्याबद्दल एनाचं खूप कौतुक होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: miss thailand look went viral after she participate in miss universe 2023 with can pull tab dress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.