Video: माकडाच्या उडीने REEL मध्ये आलं वेगळंच 'थ्रिल' !! घाबरलेल्या मुलीने पुढे काय केलं बघा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 14:53 IST2025-11-17T14:48:49+5:302025-11-17T14:53:08+5:30
monkey jump girl lap viral video: मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Video: माकडाच्या उडीने REEL मध्ये आलं वेगळंच 'थ्रिल' !! घाबरलेल्या मुलीने पुढे काय केलं बघा
monkey jump girl lap viral video: सोशल मीडियावर अनेक गोष्टी झपाट्याने व्हायरल होत असतात. इंटरनेटवर डान्स व्हिडिओ किंवा वन्यप्राण्यांचे व्हिडीओ अधिक पसंत केले जातात. पण यासोबतच काही असे व्हिडीओही असतात जे खूपच मजेदार असतात. दररोज एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतो, जो लोकांचे लक्ष वेधून घेतो. कारण सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे, जिथे सर्व वयोगटातील लोकांचे मनोरंजन होत असते. असाच एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये एक मुलगी झाडाच्या फांदीवर आरामात झोपलेली दिसते आणि कॅमेऱ्याकडे हसत पोज देत असते. छान निसर्गरम्य ठिकाण असल्याने ती मुलगी फोटो आणि रील शूट करण्यासाठी पोज देत असते. अशातच अचानक एक माकड झाडावरून वेगाने खाली येते आणि त्या मुलीच्या मांडीवरच बसते. काही सेकंदात अचानक काय घडले, हे मुलीला कळतच नाही. मुलगी इतकी घाबरते की फांदीवरून उडी मारून आपल्या आईला बिलगते. त्यावेळी साऱ्यांनाच हसू अनावर होते. पाहा व्हिडीओ-
हा व्हिडीओ @sainaidug या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल झाला आहे. काही तासांतच व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. त्यावरील लोकांच्या प्रतिक्रियाही खूप मजेदार आहेत.