VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 15:56 IST2025-09-19T15:50:54+5:302025-09-19T15:56:53+5:30

Motulal Alcohol addiction : मोटूलालची मुलाखत सध्या तुफान व्हायरल होताना दिसतेय

trending viral video bihar motulal spends 72 lakh rupees on alcohol addiction sells property jewellery | VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल

VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल

Motulal Alcohol addiction : दारूचे व्यसन वाईट असे वडिलधारी मंडळींपासून ते अगदी संतमहात्मेदेखील सांगून गेलेत. दारूच्या व्यसनाधीन झालेला माणूस दारू पिण्यासाठी सारंकाही विकून टाकतो असंही अनेकदा म्हणतात. हे अगदीच खोटं नाहीये. कारण नुकताच असा एक प्रकार समोर आला आहे. बिहारमधील एका माणसाचा दावा आहे की त्याने दारूवर तब्बल ७२ लाख रुपयांचा खर्च केलाय. त्याचे दारूचे व्यसन इतके विचित्र आहे की त्याने त्याची पूर्ण संपत्तीही विकून टाकली.

जितेश नावाच्या एका पत्रकाराने या माणसाची मुलाखत घेतली आणि तो व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर केला. त्या माणसाचे नाव उघड झालेले नाही, परंतु रिपोर्टर त्याला "मोटूलाल" असे संबोधतो. व्हिडिओमध्ये मोटू लालने स्पष्टपणे सांगताना दिसतो की, दारू पिण्यासाठी पैसे कमी पडले तेव्हा त्याने ४५ लाखांची जमीन आणि पत्नीचे दागिनेही विकले. मुलाखतीदरम्यान, तो आणि त्याच्यासोबतची महिला खूपच दुःखी दिसते. 'मोटूलाल'ला त्याच्या निर्णयाचा आता पश्चात्ताप होत आहे असे तो कबुल करतो. तसेच, दारूपाई त्याने सगळं विकलं नसतं तर तो करोडपती झाला असता, असेही तो सांगतो. पाहा व्हिडीओ

हा व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर ४.९ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्यावर विविध प्रतिक्रियाही आल्या आहेत. काही वापरकर्त्यांनी मोटूलालच्या सोबत असलेल्या महिलेबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे, तर काहींनी मोटूलालवर टीका केली आहे. "दारूच्या व्यसनामुळे कित्येत घरे उध्वस्त झाली आहेत," असा एकंदर साऱ्यांचा सूर दिसून आला आहे.

(Disclaimer: लोकमत या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी करत नाही. ही बातमी इंस्टाग्रामवरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे.)

Web Title: trending viral video bihar motulal spends 72 lakh rupees on alcohol addiction sells property jewellery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.