Shark give birth to human face baby : बापरे! मच्छीमारांच्या जाळ्यात अडकली गरोदर शार्क; पोट फाडल्यानंतर जे बाहेर आलं ते पाहून बसला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 15:44 IST2021-02-24T15:31:38+5:302021-02-24T15:44:55+5:30
Trending viral News in Marathi : जेव्हा मासेमारानं या शार्कचं पोट फाडलं तेव्हा आतून माणसाचं पिल्लू बाहेर आलं. सोशल मीडियावर या घटनेचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Shark give birth to human face baby : बापरे! मच्छीमारांच्या जाळ्यात अडकली गरोदर शार्क; पोट फाडल्यानंतर जे बाहेर आलं ते पाहून बसला धक्का
अनेकदा प्राण्यांमध्ये माणसाप्रमाणे दिसत असलेल्या कलाकृती बाहेर येत असतात. असे फोटो पाहून लोक चकीत होतात. अनेकदा माणसांच्या चेहऱ्याप्रमाणे असलेली प्राण्यांची पिल्लं समोर येतात. अशीच एक घटना सोशल मीडियावर समोर आली आहे. या फोटोमुळे लोक तुफान आकर्षित झाले आहेत.
इंडोनेशियातून ही घटना समोर आली आहे. इंडोनेशियातील एका मासेमाराच्या जाळ्यात गरोदर शार्क अडकली. जेव्हा मासेमारानं या शार्कचं पोट फाडलं तेव्हा आतून माणसाचं पिल्लू बाहेर आलं. सोशल मीडियावर या माश्याच्या पिल्लाचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
इंडोनेशियातील ४८ वर्षीय मासेमार अब्दुल्लाह नरेनने सोशल मीडियावर आपल्या जाळ्यात अडकलेल्या माश्याचे फोटो शेअर केले आहेत. शार्कच्या पोटातून बाहेर आलेल्या पिल्लाचा चेहरा हूबेहूब माणसाप्रमाणे आहे. असा प्रकार पाहून सगळेचजण चकीत झाले आहेत. गावातील लोकांनी हे पिल्लू पाहताच त्याची पूजा करायला सुरूवात केली आहे. शार्कचं हे अद्भूत पिल्लू इंडोनेशियाच्या पूर्वेकडील तेंग्गारा प्रांतात मिळालं आहे.
सॅल्यूट! एनसीसी कॅम्पमध्ये ट्रेनिंगसाठी नव्हती रायफल; आयटीआय विद्यार्थ्यानं १०० रूपयात बनवली एके-47
मासेमार अब्दुल्लाहा यांच्या जाळ्यात अचानक ही गरोदर शार्क अडकली. पोट फाडल्यानंतर त्यातून तीन पिल्लं बाहेर आली आणि सगळ्याचंच लक्ष वेधून घेतलं. या पिल्लांचा चेहरा लहान मुलाप्रमाणे होता. या माश्याच्या पिल्लाचे दोन डोळे माणसाप्रमाणे दिसत होते. त्यातील एका पिल्लाचा चेहरा खूप आगळा वेगळा होता.
हाय हिल्स घालून ती धाव धाव धावली; कधीही पाहिला नसेल असा स्टंट, व्हिडीओ झाला तुफान व्हायरल
या पिल्लांना मासेमार लगेचच आपल्यासोबत घरी घेऊन गेला आणि ही गोष्ट संपूर्ण गावात पसरली. गावातील लोक हा चमत्कार पाहण्यासाठी अब्दूल्लाहच्या घरी येत होते. अब्दूल्लाहने सांगितले की, ''ही दोन्ही पिल्लं खरेदी करण्यासाठी लोक प्रयत्न करत आहेत. हे शार्कचं मुल माझ्यासाठी लकी ठरू शकतं, म्हणून मी यांना विकण्याचा विचार कधीही करणार नाही.''