VIDEO: महिला जीपमागे लपून काढत होती फोटो, अचानक मागून आला चित्ता अन् मग जे झालं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 17:57 IST2025-10-17T17:56:12+5:302025-10-17T17:57:02+5:30
Cheetah Wildlife video: चित्ता मागे आल्याचे महिलेला थोडं उशिराच कळलं...

VIDEO: महिला जीपमागे लपून काढत होती फोटो, अचानक मागून आला चित्ता अन् मग जे झालं...
Cheetah Wildlife video: वन्यप्राण्यांचे व्हि़डीओ हा सोशल मीडियावर हमखास पाहिला जाणारा प्रकार आहे. जंगलातील वन्य प्राणी कसे चालतात, काय करतात, शिकारीसाठी कसा दबा धरून बसतात, शिकार करताना कोणती पद्धत वापरतात अशा साऱ्या गोष्टींचे मनुष्यप्राण्याला नेहमीच कुतूहल असते. त्यामुळे सोशल मीडियावर अशाप्रकारच्या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. असाच एक जंगलातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एका चित्त्याचा आहे. फोटो काढणाऱ्या माणसाच्या बाजूला चित्ता अचानक आल्यानंतर काय घडते, याबद्दलचा हा व्हिडीओ आहे.
व्हिडीओमध्ये काय घडते?
जंगल सफारी दरम्यान जीपजवळ जमिनीवर बसून एक महिला वाइल्डलाइफ फोटोग्राफर आनंदाने चित्त्यांचे फोटो काढत असते. तिच्यासोबत आणखी एक साथीदारही असतो. अचानक मागून एक चित्ता येतो आणि तिच्या शेजारी बसतो. पाहा व्हायरल व्हिडीओ-
"Hey guys! What are we looking at?” 😅 pic.twitter.com/nKQrl8SRkM
— Buitengebieden (@buitengebieden) October 15, 2025
चित्ता पुढे काय करतो?
चित्ता महिलेच्या अगदी शेजारी बसलेला दिसतो, पण तो कुणालाही इजा करत नाही. उलट जी महिला फोटोग्राफी करत असते त्याकडे तो चित्ता पाहत बसतो, जणूकाही तो त्याच्या फोटोशूटसाठी रांगेत उभा असून, त्याची पाळी येण्याची वाट पाहत असतो. हे दुर्मिळ फुटेज दक्षिण आफ्रिकेतील असल्याचे सांगितले जात आहे.
१६ ऑक्टोबरला हा व्हिडीओ एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर करण्यात आला आहे. तेव्हापासून या व्हिडीओने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. हा व्हिडिओ एका दिवसात १ कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर लाखो लोकांनी लाईक केला आहे. व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर प्रश्नही विचारले आहेत.