Trending Video: चालत्या मेट्रोत हाय व्होल्टेज ड्रामा, मुलीनं मुलाच्या कानाखाली लगावल्या थापडा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 15:51 IST2022-07-13T15:50:40+5:302022-07-13T15:51:32+5:30
मुलीने थापड मारल्यानंतर संबंधित मुलगाही संतापतो आणि हात उचलतो. पण...

Trending Video: चालत्या मेट्रोत हाय व्होल्टेज ड्रामा, मुलीनं मुलाच्या कानाखाली लगावल्या थापडा!
इंटरनेटवर सातत्याने एकाचडी एक व्हिडिओ समोर येत असतात. यातील काही व्हिडिओ पाहून तर अनेक वेळा आश्चर्य वाटते. असाच एक व्हिडिओ पाहून आपल्यालाही आश्चर्य वाटेल. या व्हिडिओमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी शर्टच्या किमतीवरून भांडताना दिसत आहेत. हे भांडत एवढे वाढते, की संबंधित मुलगी मुलाशी भांडताना संतापाच्या भरात थेट हातच उचलते.
प्रँक व्हिडिओ, की खरोखरच मारल्या थापडा? -
मुलीने थापड मारल्यानंतर संबंधित मुलगाही संतापतो आणि हात उचलतो. पण, हा केवळ प्रँक व्हिडिओ (Prank Video) आहे, की मेट्रोमध्ये एवढ्या लोकांसमोर हे दोघे खरोखरच भांडत होते, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. हा संपूर्ण वाद साध्या एका टीशर्टच्या किंमतीपासून सुरू झाला.
खरे तर, आधी संबंधित मुलगी त्या मुलाला सांगते, की मी हा टी-शर्ट जारामधून हजार रुपयांना विकत घेतला आहे. यावर मुलगा म्हणतो, की हा टी-शर्ट केवळ 150 रुपयांचा आहे. यानंतर दोघांमध्ये जबरदस्त वाद सुरू होतो.
आए हो मेरी ज़िंदगी में तुम ‘बवाल’ बनके….#मेट्रो_लाइफ@SudhirMisraNBT@navalkant@Live_Gyan@PANKAJPARASHAR_@PANKAJPARASHAR_@candidbhanotpic.twitter.com/I9hDwkCzbX
— Manish Mishra (@mmanishmishra) July 12, 2022
अशा येतायत लोकांच्या प्रतिक्रिया -
हा व्हिडिओ पाहून काही लोकांनी हे (Social Media Users) कपल असल्याचे म्हटले आहे. तर काहींना हे भाऊ-बहीण वाटले. एका युजरने म्हटले आहे, की हे अगदी भावा-बहिणीसारखेच भांडण करत आहेत.