VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 17:32 IST2025-11-13T17:31:27+5:302025-11-13T17:32:14+5:30
leopard crocodile wildlife video : सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने एक वेगळेच चित्र दाखवून दिले

VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
leopard crocodile wildlife video : बिबट्या असो वा मगर, या दोनही प्राण्यांची जेव्हा नावं घेतली जातात तेव्हा भीतीने भल्याभल्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. कारण एक पाण्यातील शिकार करण्यात प्रवीण आहे तर दुसरा जंगलातील शिकार करण्यात निष्णात आहे. दोघेही आपापल्या प्रदेशात इतके क्रूर प्राणी आहेत की केवळ सामान्य प्राणीच नाही, तर शक्तिशाली शिकारी देखील त्यांच्यापासून दूरच राहतात. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने एक वेगळेच चित्र दाखवून दिले आहे. म्हणूनच हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.
व्हिडिओमध्ये, नदीच्या काठी पाच ते सहा मगरी एका प्राण्याचे मांस फाडत आहेत. अचानक, जंगलातील बिबट्या तेथे येतो. त्याच्या चेहऱ्यावर कसीलीह भीती दिसत नाही. तो आत्मविश्वासाने पावलं टाकत पुढे येतो आणि तो मगरींच्या समोरच त्यांनी केलेल्या शिकारीचे लचके तोडायला सुरूवात करतो. बिबट्या चक्क एका मगरीच्या जबड्यात अडकलेले मांस हिसकावून घेण्याचाही प्रयत्न करतो. पण मगरीची पकड इतकी मजबूत असते की बिबट्याला फारसे यश मिळत नाही. त्याला थोडेफार मांस खायला मिळते. पण बिबट्याच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे. पाहा व्हिडीओ-
सोशल मीडियावर हा विषय चर्चेचा बनला आहे. वन्यजीव तज्ञांच्या मते, बिबटे सहसा मगरींच्या इतक्या जवळ जात नाहीत. परंतु क्वचित प्रसंगी खूप जास्त भूक असते किंवा त्यांना प्रचंड आत्मविश्वास असतो, तेव्हा ते असा धोका पत्करतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. नेटकऱ्यांनीही त्यावर तुफान कमेंट्स केल्यात.