Viral Video: हत्तीला पाहून सिंह मंडळींची 'हवा टाइट'... झाडाखाली बसले असताना काय घडलं, पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 16:48 IST2025-10-31T16:47:19+5:302025-10-31T16:48:25+5:30
lion elephant viral video: एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे.

Viral Video: हत्तीला पाहून सिंह मंडळींची 'हवा टाइट'... झाडाखाली बसले असताना काय घडलं, पाहा
lion elephant viral video: सिंहाला जंगलाचा राजा म्हटले जाते. पण खरं पाहायचं तर जंगलात असेही अनेक प्राणी असतात, ज्यांच्याकडे सिंहापेक्षा खूप जास्त ताकद असते. सिंह हा चपळाई, धूर्तपणा आणि शिकार करण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जातो. परंतु जेव्हा शक्तिशाली प्राण्यांचा विचार केला जातो, तेव्हा हत्तीपुढे कुणाचंही काही चालत नाही. खुद्द सिंहदेखील हत्तीच्या सामर्थ्याला आणि महाकाय देहाला घाबरतो. तसाच एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे.
अलिकडेच इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. व्हिडिओमध्ये, एक सिंहाचे कुटुंब एका झाडाखाली विश्रांती घेत असते. काही जण झोपलेले असतात, तर काही निवांत बसून आजूबाजूला पाहत असतात. संपूर्ण वातावरण शांत आणि आल्हाददायक असते. इतक्यात मागून एक हत्ती त्या झाडाच्या दिशेने चालत येतो. हत्तीला पाहून सगळे सिंह झटपट पळ काढतात. एक सिंह तिथेच बसून राहतो. पण त्यालाही हत्तीच्या येण्याची चाहुल लागल्यावर, तो पळ काढतो. पाहा व्हिडीओ-
सिंहांच्या पळापळीचा हा व्हिडीओ makwavi_african_safaris नावाच्या अकाउंटवरन पोस्ट करण्यात आला आहे. अवघ्या १० सेकंदांच्या या व्हिडिओला बरीच पसंती मिळताना दिसत आहे. नेटकरीही त्यावर मजेशीर कमेंट करताना दिसत आहेत.