VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 21:39 IST2025-10-08T21:35:14+5:302025-10-08T21:39:30+5:30
Bride Groom Funny Wedding Video: लग्नातील वरमाला घालण्याचा विधी सुरू असतानाच घडला मजेशीर प्रकार

VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
Bride Groom Funny Wedding Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याची काहीही शाश्वती नाही. कधी एखादे गाणे व्हायरल होते, तर कधी एखाद्या व्हिडीओची चर्चा रंगते. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये अनेक प्रकार दिसून येतात. काही व्हिडीओ पाहून हसू येते, तर काही व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी येते. पण सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो, ज्यात नवरदेवाची आपल्या होणाऱ्या बायकोसमोरच फजिती होते. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
आपल्या आजुबाजूला अचानक एखादा फटाका फुटला तर कुणालाही दचकायला होईल किंवा काहींना घाबरायलाही होऊ शकेल. अशीच एका नवरदेवाचीही परिस्थिती दिसून आली. व्हायरल झालेला व्हिडिओ हा हार लग्नातील वरमाला विधीचा आहे. यातील वराची अवस्था पाहून सगळेच गोंधळून जातात. व्हिडिओमध्ये वधू आणि वर लग्नात वरमाला घालण्यासाठी उभे असतात. त्यांच्याभोवती नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी उपस्थित असतात. वर वधूच्या गळ्यात हार घालण्यासाठी पुढे येताच, मागून कोणीतरी फटाक्यासारखा सेलिब्रेशन वाला पॉपर फोडतो. अचानक झालेल्या आवाजाने नवरदेव खूपच घाबरतो. त्याची अवस्था पाहून सारेच हसतात. पण त्याची मात्र होणाऱ्या बायकोसमोर फजिती होते. काही सेकंदांसाठी त्याला शब्दच सुचत नाहीत. नंतर तो मित्रांना ओरडतो आणि पुन्हा पोज देण्यासाठी उभा राहतो. पाहा व्हिडीओ-
हा व्हिडिओ @golu_barwal_rani_jemti_dj08 नावाच्या वापरकर्त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर लगेचच व्हायरल झाला आणि त्याला २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.