VIDEO: स्वॅग..!! मुलींच्या वर्गात अचानक शिरला कुत्रा; बिनधास्तपणे चालत आत आला अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 14:18 IST2025-11-12T14:17:37+5:302025-11-12T14:18:22+5:30
Dog enters class room video: मुलींचा वर्ग सुरू होता, शिक्षिका शिकवतानाच घडला प्रकार

VIDEO: स्वॅग..!! मुलींच्या वर्गात अचानक शिरला कुत्रा; बिनधास्तपणे चालत आत आला अन् मग...
Dog enters class room video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याची काहीही शाश्वती नाही. कधी एखादा फोटो किवा व्हिडीओ व्हायरल होतो, तर कधी एखादे गाणे किंवा वेगळ्याच गोष्टींची चर्चा रंगते. सोशल मीडियावर हल्ली प्राण्यांचे व्हिडीओ अतिशय आवडीने पाहिले जातात. प्राणीप्रेमी असो किंवा इतर कुणीही, प्राण्यांचे व्हिडीओ साऱ्यांचेच मनोरंजन करतात. पण काही वेळा अचानक एखादा प्राणी आपल्याजवळ आला तर घाबरायला होणे स्वाभाविक आहे. तसाच एक प्रकार एका व्हिडीओमध्ये घडलेल्या दिसला.
काही विद्यार्थीनी कॉलेजमध्ये बाकावर बसून शिक्षकांकडून धडे घेत आहेत. तितक्यात त्या वर्गात अचानक एक कुत्रा येतो. त्या कुत्र्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भाव नसतात. तो अतिशय बिनधास्तपणे वर्गात येतो आणि चालत चालत पुढे जातो. कुत्रा इतका आत्मविश्वासाने परिपूर्ण असतो की जसे काही या विद्यार्थिनी त्याच्या ओळखीच्या आहे. या मजेदार व्हिडिओमागे "गिम्मे गिम्मे" हे गाणं वाजतंय त्यामुळे व्हिडीओ अजूनच मजेदार बनतोय. पाहा व्हायरल व्हिडीओ-
Dosgeswag🥵 pic.twitter.com/L1Epmht2FG
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 10, 2025
हा व्हिडिओ एक्स वर @gharkekalesh या अकाउंटवरून "DosgeSwag" या कॅप्शनसह पोस्ट करण्यात आला आहे. पोस्ट केल्यानंतर काही तासांतच या व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. आतापर्यंत तो हजारोंनी व्हिडीओ पाहिला आहे. तसेच कमेंट सेक्शनमध्येही मजेदार प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.