टॉयलेटजवळ झोपलेल्या जवानांना TCने मिळवून दिली 'हक्काची सीट'; Video पाहून नेटकऱ्यांनी केला सलाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 16:28 IST2026-04-02T16:26:06+5:302026-04-02T16:28:56+5:30

Jawan TTE viral video: त्या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.

trending-tte-wakes-crpf-jawan-sleeping-near-toilet-of-sleeper-coach-gives-heartwarming-treatment | टॉयलेटजवळ झोपलेल्या जवानांना TCने मिळवून दिली 'हक्काची सीट'; Video पाहून नेटकऱ्यांनी केला सलाम

टॉयलेटजवळ झोपलेल्या जवानांना TCने मिळवून दिली 'हक्काची सीट'; Video पाहून नेटकऱ्यांनी केला सलाम

Jawan TTE viral video: सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना प्रवासादरम्यान अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. अशाच एका प्रसंगाचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. पण या व्हिडीओत जे घडते, ते पाहून प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून येईल.

व्हायरल व्हिडिओमध्ये नक्की काय आहे?

व्हिडिओमध्ये काही CRPF चे जवान रेल्वेच्या कोचमध्ये जमिनीवर, अगदी टॉयलेटच्या दरवाजाजवळ चादर पसरून झोपलेले दिसतात. ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असल्याने आणि कन्फर्म तिकीट नसल्याने या जवानांना तिथेच आश्रय घ्यावा लागतो. जेव्हा ड्युटीवर असलेला टीटीई जवानांना अशा अवस्थेत पाहतो, तेव्हा तो क्षणाचाही विलंब न लावता त्यांना उठवतो. टीटीईने त्या जवानांना टॉयलेटजवळून उठवून स्वतःच्या हक्काची कन्फर्म सीट मिळवून देतो आणि तिथेच विश्रांती घेण्यास सांगतो.


नेटकऱ्यांकडून कौतुक

हा व्हिडिओ एका प्रवाशाने शूट केला असून, तो सोशल मीडियावर शेअर केला आहे. "जे जवान आपल्यासाठी रात्रंदिवस जागे राहतात, त्यांना अशी वागणूक मिळणे दुर्दैवी आहे, पण टीटीईने दाखवलेली माणुसकी कौतुकास्पद आहे," अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेमंत्री आणि सरकारकडे एक मागणी जोर धरत आहे की, कर्तव्यावर जाणाऱ्या किंवा सुट्टीवरून परतणाऱ्या जवानांसाठी रेल्वेत 'स्पेशल कोटा' किंवा स्वतंत्र आसन व्यवस्था असावी, जेणेकरून त्यांना अशा प्रकारे जमिनीवर झोपण्याची वेळ येणार नाही.

Web Title : टॉयलेट के पास सो रहे जवानों को टीसी ने सीट दिलाई; लोगों ने किया सलाम

Web Summary : वायरल वीडियो में जवान टॉयलेट के पास सो रहे थे। टीटीई ने उनकी मदद की और कन्फर्म सीट दिलवाई। लोगों ने टीटीई की मानवता की सराहना की और ट्रेनों में जवानों के लिए विशेष कोटा की मांग की।

Web Title : TC Helps Soldiers Sleeping Near Toilet Get Seats; Netizens Salute

Web Summary : A viral video shows soldiers sleeping near a train toilet. A TTE (Traveling Ticket Examiner) helps them get confirmed seats. Netizens praise the TTE's humanity and demand a special quota for soldiers in trains.