Video - कर्माचं फळ! ट्रॅक्टर चोरी करायला गेला अन् त्याच्याच चाकाखाली आला, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 13:09 IST2023-09-12T13:02:08+5:302023-09-12T13:09:11+5:30

रात्रीच्या अंधारात एक व्यक्ती ट्रॅक्टर चोरण्यासाठी आला होता. आपल्या उद्दिष्टात तो यशस्वीही झाला. मात्र ट्रॅक्टर चोरी करताना त्याच्यासोबत असं काही घडलं जे पाहून लोक हैराण झाले.

tractor thief comes under tyre mid robbery in gujarat watch viral cctv video | Video - कर्माचं फळ! ट्रॅक्टर चोरी करायला गेला अन् त्याच्याच चाकाखाली आला, पण...

Video - कर्माचं फळ! ट्रॅक्टर चोरी करायला गेला अन् त्याच्याच चाकाखाली आला, पण...

ट्रॅक्टर चोरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे प्रकरण गुजरातचे असल्याचे सांगण्यात येत आहे. जिथे रात्रीच्या अंधारात एक व्यक्ती ट्रॅक्टर चोरण्यासाठी आला होता. आपल्या उद्दिष्टात तो यशस्वीही झाला. मात्र ट्रॅक्टर चोरी करताना त्याच्यासोबत असं काही घडलं जे पाहून लोक हैराण झाले. चोरीची संपूर्ण घटना एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये चोराने कसा तरी ट्रॅक्टर सुरू करताच तो चुकून ट्रॅक्टरच्याच चाकाखाली दबला गेल्याचं स्पष्ट दिसत आहे. ट्रॅक्टरचे चाक त्याच्या अंगावरून गेल्यावर तो पुन्हा त्याच्या पायावर उभा राहतो आणि कसा तरी चालत्या ट्रॅक्टरवर चढतो आणि तो घेऊन पळून जातो. चोराचा हा पराक्रम पाहून काही यूजर्सनी त्याला 'बाहुबली चोर' असं म्हटलं आहे.

ट्रॅक्टर चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 30 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये रात्रीच्या अंधारात एक माणूस ट्रॅक्टरजवळ उभा असल्याचं आपण पाहू शकतो. काही अडचणीनंतर तो चावीशिवाय ट्रॅक्टर सुरू करतो. आता ट्रॅक्टर चालू होताच पुढे जाऊ लागतो. चोर त्याच्या चाकाखाली येतो. मात्र, ट्रॅक्टर त्या चोराला ओलांडून पुढे निघून जातो. तो चोर कसा तरी उभा राहतो आणि पटकन ट्रॅक्टरवर चढतो आणि पळून जातो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: tractor thief comes under tyre mid robbery in gujarat watch viral cctv video