Topless Female Fan in Match, Javon Johanson: टॉपलेस होऊन महिला थेट सामना सुरू असताना घुसली मैदानात अन्... ; पाहा व्हिडीओ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 17:29 IST2022-04-11T17:24:24+5:302022-04-11T17:29:32+5:30

हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला

topless female fan streaker invavded live rugby match in australia football viral video photos javon johanson | Topless Female Fan in Match, Javon Johanson: टॉपलेस होऊन महिला थेट सामना सुरू असताना घुसली मैदानात अन्... ; पाहा व्हिडीओ 

Topless Female Fan in Match, Javon Johanson: टॉपलेस होऊन महिला थेट सामना सुरू असताना घुसली मैदानात अन्... ; पाहा व्हिडीओ 

Topless Female Fan in Match: ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या रग्बी लीग दरम्यान एक महिला फॅन टॉपलेस होऊन मैदानात घुसल्याने अचानक सामना थांबल्याची घटना नुकतीच घडली. गोल्ड कोस्ट टायटन्स आणि पॅरामाटा ईल्स यांच्यातील सामन्यात टॉपलेस झालेली एक महिला स्टँडवरून थेट मैदानात घुसली. तिने असं का केलं, या कारणासह त्या महिलेबाबत अनेक गोष्टी हळूहळू उलगडल्या आहेत. जोव्हॉन जोहानसन (Javon Johanson) असे या महिलेचे नाव असून तिच्या मित्रमंडळींनी सांगितले की, ती असं काहीतरी करणार आहे याची तिला अजिबात कल्पना नव्हती. त्यानंतर काही गोष्टींचा खुलासा झाला.

जोव्हॉन जोहानसनने सांगितले की असे करणे हा तिच्या बकेट लिस्टचा भाग होता. म्हणूनच ती या क्षणाची वाट पाहत होती. जोव्हॉन जोहान्सनने टॉपलेस होत मैदानात प्रवेश केल्याचा व्हिडीओ भरपूर व्हायरल झाला. तिला रोखण्यासाठी अनेक सुरक्षा कर्मचारी मैदानात घुसले होते आणि त्यांनी तिला मैदानातून बाहेर आणले. मात्र, सोशल मीडियावर यावर लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. काहींनी पोलिसांच्या कृतीला चुकीचे म्हटले, तर काहींनी महिलेच्या कृतीला चुकीचे ठरवले.

पण जोव्हॉन म्हणाली की यात सुरक्षा कर्मचार्‍यांची चूक नाही. ते त्यांचे काम करत होते. पण असे असले तरी मला जे करायचे होते, ते मी केले. माझ्या मित्रांनी मला चॅलेंज दिले होते. त्यामुळे तशी वागले, असंही तिने सांगितले.

Web Title: topless female fan streaker invavded live rugby match in australia football viral video photos javon johanson