Toddler getting angry while getting a haircut with cutest video | जबरदस्ती केस कापताना रडकुंडीला आला चिमुरडा; अन् न्हाव्याला धमकीच दिली, पाहा व्हिडीओ

जबरदस्ती केस कापताना रडकुंडीला आला चिमुरडा; अन् न्हाव्याला धमकीच दिली, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर एक चिमुरड्याचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. तुम्हाला आठवत असेल लहानपणी केस किंवा नखं कापायला खूप जिवावर येते. लहान मुलं केस कापायला अजिबात तयार नसतात.  जरी घरच्यांनी जबरदस्ती कापायला बसवलं तरीही रडारड सुरू असते. असाच एक गमतीदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसायला येईल किंवा तुमचं लहानपण नक्कीच आठवेल. 

केस कापण्याची जराही इच्छा नसताना या चिमुरड्याला केस कापायला लागत आहे. न्हावी जसजसे केस कापत आहे. तसतसा हा चिमुरडा 'अरे यार.... बाल मत काटो' असं म्हणत त्याला थांबवत आहे. हा न्हावी केस कापत असताना या चिमुरड्याला वेगवेगळे प्रश्न विचारत आहे. पण प्रश्नांची उत्तर दिल्यानंतरही हा चिमुरडा रागात असतो.  त्यानंतर न्हाव्याला प्रेमळ धमकी देण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडिया युजर्स या मुलाच्या क्यूटनेसचे चाहते झाले आहेत. 

 बाबो! 'या' राजकुमारीचे बॉडीगार्डशी प्रेमसंबंध; अन् तोंड बंद ठेवायला दिले तब्बल १२ कोटी

हा व्हिडीओ @Anup20992699 या  ट्विटर युजरने २२ नोव्हेंबरला शेअर केला होता. त्यांनी या फोटोला कॅप्शन दिलं आहे की, माझा मुलगा अनुश्रृता. आतापर्यंत ९ लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून ४९ हजारापेक्षा पर्यंत लोकांनी या लाईक्सचा वर्षाव केला आहे. आतापर्यंत २ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे.  BRT बस खराब झाली अन् पाकिस्तानचे लोक धक्का मारायला गेले; भारतीयांनी उडवली खिल्ली, पाहा व्हिडीओ

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Toddler getting angry while getting a haircut with cutest video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.