सावधान! मोबाइल कव्हरमध्ये नोटा ठेवता? फोनमध्ये होऊ शकतो स्फोट...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 14:08 IST2023-10-02T14:07:20+5:302023-10-02T14:08:06+5:30
Viral Video : जर तुम्हीही तुमच्या मोबाइल कव्हरमध्ये पैसे ठेवत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडीओ शॉकिंग ठरू शकतो.

सावधान! मोबाइल कव्हरमध्ये नोटा ठेवता? फोनमध्ये होऊ शकतो स्फोट...
Viral Video : तुम्ही अशा अनेक लोकांना पाहिलं असेल जे मोबाइल फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवतात. आजकाल लोक पाकिट सोबत ठेवत नाहीत, अशात लोक मोबाइल कव्हरमध्ये नोटा ठेवतात. ऑनलाइन पेमेंट सुरू झाल्यापासून लोकांना कॅश सोबत ठेवण्याची गरज पडत नाही. पण काही लोक मोबाइल कव्हरमध्ये पैसे ठेवतात. पण असं करणं फार घातक ठरू शकतं.
जर तुम्हीही तुमच्या मोबाइल कव्हरमध्ये पैसे ठेवत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडीओ शॉकिंग ठरू शकतो. मोबाइल कव्हरमध्ये नोट ठेवणं तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. कारण याने मोबाइलमध्ये स्फोट होऊ शकतो. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, मोबाइल कव्हरमध्ये नोट ठेवणं घातक कसं ठरू शकतं? तर हे हा व्हिडीओ पाहून तुमच्या लक्षात येईल.
तुम्ही फोनमध्ये नोट ठेवत असाल तर वेळीच सावध व्हायला हवं. मुळात फोन यूज करताना तो अनेकदा गरम होतो. फोनचं प्रोसेसर ज्या स्पीडने काम करतं. तेच फोनच्या तापमानाला कंट्रोल करतं. जर तुमचा मोबाइल जास्त गरम होत असेल तर त्यात ठेवलेली नोट तुमच्यासाठी जीवघेणी ठरू शकते. गरम फोनमध्ये कागदापासून तयार नोटेला आग लागू शकते आणि बघता बघता तुमचा मोबाइल जळून राख बनू शकतो. स्फोट झाला तर तुम्हाला धोका होऊ शकतो.
सोशल मीडियावर या धक्कादायक माहितीचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यात दाखवण्यात आलं आहे की, कशाप्रकारे कव्हरमध्ये नोट ठेवल्याने त्यात कशी आग लागते. हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत. लोकांच्या वेगवेगळ्या कमेंट्स या व्हिडिओवर येत आहेत.