शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

Viral Video: वाघाने केली पिल्लाची शिकार, हतबल आई मात्र पाहत राहिली! रणदिप हुडा म्हणाला, ये जंगल है!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 12:25 IST

काही वेळा परिस्थितीसमोर आईही हतबल होते. कितीही धडपड केली तरी तिला आपल्या पिल्लाला काही वाचवता येत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

माणूस असो वा प्राणी-पक्ष्यांसारखे मुके जीव. त्यांच्यातील आईचं प्रेम हे सारखंच. आपल्या पोटच्या गोळ्यावर कितीही मोठं संकट आलं तरी आई त्यांच्यासमोर ढाल बनून उभी राहते. त्यांच्यावरील संकट स्वतः झेलते, त्यांना साधी एक जखमही होऊ देत नाही. पण काही वेळा परिस्थितीसमोर आईही हतबल होते. कितीही धडपड केली तरी तिला आपल्या पिल्लाला काही वाचवता येत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Animal hunting video).

मध्य प्रदेशच्या कान्हा नॅशनल पार्कमधील वाघ आणि रानगव्यांचा व्हिडीओ समोर आला आहे (Tiger attack on gaur). वाघाने रानगव्याची शिकार केली आहे. रानगव्याच्या पिल्लावर वाघाने हल्ला केला. त्याला आपल्या जबड्यात धरलं. त्याला वाचवण्यासाठी, वाघाच्या जबड्यातून सोडवण्यासाठी आईने धडपड केली. पण अखेर तीसुद्धा काहीच करू शकली नाही. पिल्लाने तिला आपल्याला वाचवण्याची संधीच दिली नाही. आपली आई आणि इतर भावंडांचा जीव वाचवण्यासाठी अखेर खुद्द पिल्लानेच वाघाच्या जबड्यात जाणं स्वीकारलं. आईच्या डोळ्यादेखत तिचं पिल्लू वाघाची शिकार झालं.

व्हिडीओत पाहू शकता एका ठिकाणी काही रानगवे आहेत. एक रानगवा शांत बसला आहे. त्याची आई आणि इतर भावंडं तिथंच आसपास आहेत.  इतक्या एक वाघ गुपचूप तिथं येतो. बसलेल्या रानगव्याजवळ वाघ पोहोचतो पण तोपर्यंत कुणालाही त्याची कल्पना नसते. जसा वाघ रानगव्यावर हल्ला करणार तसा रानगवा उठून आपला जीव वाचवण्यासाठी पळतो. पण रानगव्याला उठून पळणं काही जमत नाही. शेवटी तो वाघाच्या तावडीत सापडतो.

वाघ रानगव्याची मान आपल्या जबड्यात धरतो आणि त्याला फरफटत नेतो. तोपर्यंत इतर रानगवे दूर पळालेले असतात. रानगव्याची आई मात्र एका झाडामागे लपून बसलेली असते. जेणेकरून संधी मिळताच आपल्या पिल्लाला वाघाच्या तावडीतून सोडवता येईल. वाघाच्या जबड्यात पिल्लू तडफडत होतं. ते पाहून आईला काही राहवलं नाही. ती पटकन पुढे येते आणि पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न करते.

आई रानगवा आपल्या शिंगानी आपल्या पिल्लाला सोडवायला जाते. तेव्हा वाघाच्या जबड्यातून पिल्लू बाहेर पडतं. पण ते आपले मागील दोन्ही पाय आईच्या दिशेने भिरकावत तिला आपल्यापासून दूर लोटतं.  वाघ पुन्हा त्याच्या मानेला धरतो.  आईही हतबल झालेली पाहायला मिळते आहेत. वाटत असूनही ती पिल्लासाठी काहीच करू शकत नाही. तिथं उभी राहून आपल्या पिल्लाला पाहत राहते. तिच्या डोळ्यादेखत तिच्या पिल्लाची शिकार होत असते.

मुख्य म्हणजे हा व्हिडिओ अभिनेता रणदीप हुडा याने ट्वीट केला आहे. त्याने इंग्रजीत कॅप्शन दिलंय, 'It's Jungle out there!!'

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरRandeep Hoodaरणदीप हुडा