VIDEO : तीन चोर मिळूनही चोरी करू शकले नाहीत एक टीव्ही, सीसीटीव्हीत कैद झाली घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 17:48 IST2022-01-28T17:46:00+5:302022-01-28T17:48:33+5:30
Funny Video : सध्या तीन चोरांचा एक फनी व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ते कशाची चोरी करतात आणि कशाप्रकारे करतात हे बघून तुम्ही पोट धरून हसाल.

VIDEO : तीन चोर मिळूनही चोरी करू शकले नाहीत एक टीव्ही, सीसीटीव्हीत कैद झाली घटना
सोशल मीडियाच्या (Social Media) दुनियेत अनेक फनी व्हिडीओज आहेत. ते कधी व्हायरल होतील काहीच सांगता येत नाही. सध्या तीन चोरांचा एक फनी व्हिडीओ व्हायरल (Funny Viral Video) झाला आहे. ते कशाची चोरी करतात आणि कशाप्रकारे करतात हे बघून तुम्ही पोट धरून हसाल. या व्हिडीओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत तर लाइक्स पाऊसही पडलाय.
काही सेकंदाच्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, तीन चोर रात्रीच्या अंधारात एका कारमध्ये बसून चोरी करायला निघतात. तेव्हाच त्यांची नजर एका घराच्या अंगाणातील एलईडी स्क्रीनवर जाते. या एक मिनिटाच्या व्हिडीओत तुम्ही जे बघाल ते बघून तुम्ही नक्की हैराण व्हाल.
व्हिडीओत बघू शकता की, चोरांपैकी एकजण कारमधून बाहेर निघतो आणि यार्डमध्ये लागलेल्या एलईडी स्क्रीनला काढू लागतो. बराच प्रयत्न केल्यावरही त्याला काही न जमल्याने दुसरा चोर त्याच्या मदतीला येतो. दोघांनी मिळून कशीतरी एलईडी स्क्रीन काढली. दोघेही ती बाहेर घेऊन जाणार इतक्यात स्क्रीन जमिनीवर पडते आणि स्क्रीन तुटते.
सर्वात मजेदार क्षण म्हणजे जेव्हा तिसरा चोर कारच्या बॅक सीटचा दरवाजा उघडतो. पण बाकीचे दोन चोर स्क्रीन बाहेर आणू शकत नाहीत तेव्हा तो बॅक सीटचा दरवाजा बंद करतो आणि गाडीत जाऊन बसतो. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्यांना चोरी तर करता आली नाही. पण ते अडकले. हा व्हिडीओ MEMES.BKS इन्स्टाग्राम पेजवर शेअऱ करण्यात आला आहे.