चोरी केली, पळून गेला, पुन्हा परत आला, एका मिनिटात यानं जे केलं ते पाहुन लोक म्हणाली... अरे आवरा याला!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 04:05 PM2021-09-07T16:05:49+5:302021-09-07T16:07:29+5:30

काहीवेळा चोर चोरी करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरतात. त्यावेळी त्यांच्या बुद्धीची दाद द्यावी तेवढी थोडी. असाच एक चोर दुकानात चोरी करायला शिरला. शक्यतो चोर चोरी झाल्यावर पळून जातात पण हा पठ्ठ्या परत आला...

thief stole money twice in shop, funny video goes viral | चोरी केली, पळून गेला, पुन्हा परत आला, एका मिनिटात यानं जे केलं ते पाहुन लोक म्हणाली... अरे आवरा याला!

चोरी केली, पळून गेला, पुन्हा परत आला, एका मिनिटात यानं जे केलं ते पाहुन लोक म्हणाली... अरे आवरा याला!

Next

चोरचोरी करण्यासाठी फक्त संधीच्या शोधात असतात आणि ही संधी मिळताच ते हात साफ करून घेतात. काहीवेळा चोर चोरी करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरतात. त्यावेळी त्यांच्या बुद्धीची दाद द्यावी तेवढी थोडी. असाच एक चोर दुकानात चोरी करायला शिरला. शक्यतो चोर चोरी झाल्यावर पळून जातात पण हा पठ्ठ्या परत आला...

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की हा चोर एका दुकानात चोरी करण्यासाठी शिरला आहे. आधी तो दुकानातील गल्ल्यातून काही पैसे घेतो आणि तिथून निघून जातो. यानंतर काहीच सेकंदात तो पुन्हा तिथे येतो आणि पुन्हा एकदा गल्ल्यातील पैसे काढतो. चोराचं हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV) कैद झालं आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला अनेकांची पसंती मिळत आहे. याच कारणामुळे अनेकांनी यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरनं म्हटलं, की हा व्हिडिओ खरंच मजेशीर आहे. तर, दुसऱ्या एका यूजरनं म्हटलं, की वेळ लोकांना काय काय करायला लावते. आणखी एकानं लिहिलं, की तुझी मजबुरी दुकानदाराला महागात पडेल. याशिवाय इतरही अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत.

इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ ‘giedde’ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. याला मजेशीर कॅप्शनही देण्यात आलं आहे. हा व्हिडिओ इतका मजेशीर आहे की लोक तो वारंवार पाहत असून इतर प्लॅटफॉर्मवर शेअरही करत आहेत.

 

Web Title: thief stole money twice in shop, funny video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app