वेट्रेसच्या सेवेवर खुश झाला यूट्यूबर, 'टिप'मध्ये दिली नवी चकचकीत कार! तरुणीही झाली अवाक; पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 17:31 IST2023-03-31T17:30:31+5:302023-03-31T17:31:46+5:30
मिस्टर बीस्टचा एक नवा व्हिडिओ सोशल मिडियावर जबरदस्त ट्रेंडमध्ये आहे. हा व्हिडिओ त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये त्याने रेस्टॉरन्टमध्ये काम करणाऱ्या एका वेट्रेसला ब्रँड न्यू कार भेट म्हणून दिल्याचा दावा केला आहे.

वेट्रेसच्या सेवेवर खुश झाला यूट्यूबर, 'टिप'मध्ये दिली नवी चकचकीत कार! तरुणीही झाली अवाक; पाहा VIDEO
आपण मिस्टर बीस्ट हे नाव ऐकले आहे? हा 24 वर्षांचा तरुण यूट्यूबच्या (Youtube) दुनियेतील बादशाह आहे! कारण मिस्टर बीस्टचे (MrBeast) यूट्यूबवर तब्बल 139 मिलियन सब्सक्राइब्स आहेत. त्याचे खरे नाव जिम्मी डॉन्ल्डसन (Jimmy Donaldson) आगे. जो जगातील सर्वाधिक फॉलो केला जाणारा यूट्यूबर (Youtuber) आहे. त्याचा एक नवा व्हिडिओ सोशल मिडियावर जबरदस्त ट्रेंडमध्ये आहे. हा व्हिडिओ त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये त्याने रेस्टॉरन्टमध्ये काम करणाऱ्या एका वेट्रेसला ब्रँड न्यू कार भेट म्हणून दिल्याचा दावा केला आहे.
...जेव्हा वेट्रेसला यूट्यूबरवर बसत नाही विश्वास -
मिस्टर बीस्टने सोमवारी इंस्टाग्रामवर एक क्लिप शेअर केली आहे. ही क्लिप शेअर करताना त्याने, एमी (Amy) अनेक महिन्यांपासून बिना कराचीच काम करत होती. आपल्या प्रेमामुळे आम्ही हे बदलले. या क्लिपची सुरुवात बीस्टच्या प्रश्नापासून होते. तो वेटर तरुणीला विचारतो की, तिला आतापर्यंत सर्वात मोठ्या टीपमध्ये काय मिळाले? यावर ती म्हणते की, तिला 50 डॉलरची (4100 रुपये) सर्वात मोठी टीप मिळाली आहे. यावर मिस्टर बीस्ट म्हणतो, मी आपल्याला टीपमध्ये कार देतो. वेट्रेसला आश्चर्याचा धक्काच बसतो. हे सत्य आहे की गम्मत, हे तिला कळत नाही. ती म्हणते, ही तर केवळ कारची चावी आहे. मग काय... बीस्ट तिला कार दाखविण्यासाठी बाहेर घेऊन जातो. उर्वरित कहाणी आपण व्हिडिओमध्ये बघू शकता....
व्हिडिओला मिळाले आहेत 1 कोटीहून अधिक व्ह्यूज -
या व्हिडिओला आतापर्यंत जवळपास 11 लाख हून अधिक लाइक्स आणि 1 कोटी हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावर हजारो लोक प्रतिक्रियाही देत आहेत. काही युजर्स म्हणत आहेत, मिस्टर बीस्टने मनं जिंकली. काही लोक म्हणतायत वेट्रेसचं नशीब चमकलं. तर काही लोक म्हणतायत, मिस्टर बीस्ट आमच्या देशातही या...