"भाऊ तो अजगर आहे, तुझी..."! अजगराला Kiss करत होता तरुण, त्यानं तोंडच पकडलं अन्...; Video बघून थरकाप उडेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 13:45 IST2024-12-15T13:42:15+5:302024-12-15T13:45:05+5:30
इंडियन रॉक पायथन, ज्याला भारतीय अजगर म्हणूनही ओळखले जाते. हे अत्यंत धोकादायक असतात.

"भाऊ तो अजगर आहे, तुझी..."! अजगराला Kiss करत होता तरुण, त्यानं तोंडच पकडलं अन्...; Video बघून थरकाप उडेल!
सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी आणि लाईक्स मिळवण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. अनेक वेळा त्यांची कृत्ये अथवा स्टंट त्यांच्याच अंगलट येतात. अनेकदा तर याचे परिणाम एवढे गंभीर असतात की, पाहणाऱ्यांचाही थरकाप उडावा. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरून अजगराचे चुंबन (Kiss) घेताना दिसत आहे. मात्र, त्याचे हे प्रेम अजगराला आवडले नाही आणि अजगराने अचानकच त्याच्या तोंडावर हल्ला केला. यानंतर, संबंधित तरुणाच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली आहे.
अजगराला किस करत होता तरुण तेवढ्यात... -
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक तरुण अजगराला हातात घेऊन त्याच्या सोबत खेळत आहे. दरम्यान, संबंधित तरुण अजगराला किस करण्याचा अथवा त्याचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात अजगर आक्रमक होतो आणि त्या तरुणावर हल्ला करतो. अजगरचा हल्ला एकवढा भयानक असतो की, त्याचे दात तरुणाच्या ओठात आणि गालात घुसतात. यानंतर मोठ्या प्रयत्नाने तरुण आपल्या गालातून अजगराचे दात काढतो आणि स्वतःची सुटका करून घेतो. अजगराच्या हल्ल्यात तरुणाच्या चेहऱ्यावर जखम झाली आहे.
अत्यंत 'खतरनाक' असतात अजगर -
इंडियन रॉक पायथन, ज्याला भारतीय अजगर म्हणूनही ओळखले जाते. हे अत्यंत धोकादायक असतात. एवढे धोकादायक की, त्यांनी एखाद्या व्यक्तीला पकडे अथवा कवेत घेतले, तर त्याचे प्राण घेऊनच राहतात. हे विषारी नसले तरी, केवळ एका चाव्यात मानवी शरीराचे सुमारे अर्धा किलो मांस काढू शकतात. यामुळे संबंधित तरुणावर झालेला अजगराचा हल्ला हा हृदयाचा ठोका चुकवणारा आहे. व्हायरल व्हिडिओवर युजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.
“जहरीले जानवरों से सावधान रहें - सुरक्षा ही बचाव है!”
— PUKHRAJ MALI🚩 (@pmali1988) December 12, 2024
चुम्मा 😘 लेने की कोशिश कर रहा था उसने इच्छा पूरी कर ली 🤣🤣 #पुखराज_माली ✍️ pic.twitter.com/SPEucCws5o
हा व्हिडिओ @pmali1988 नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत 2.6 मिलियन हून अधिक वेळा बघितला गेला आहे. यावर प्रतिक्रिया देताना एका युजरने म्हटले आहे, "घे भाऊ, आली टेस्ट." आणखी एका युजरने लिहिले, "भाऊ आपली एक्स समजून चुंबन घेत असेल." तर आणखी एकाने म्हटले आहे, "भाऊ तो अजगर आहे, तुझी बायको नाही."