तरुणाला बाईकवर स्टंट करणं पडलं भारी; VIDEO मध्ये बघा खतरनाक अॅक्सिडेंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 19:32 IST2022-01-25T19:29:39+5:302022-01-25T19:32:03+5:30
हा व्हिडिओ अत्यंत खतरनाक आहे. या व्हिडिओत स्टंट करणाऱ्या तरुणाचा कसा अपघात झाला हे दिसत आहे. सोशल मिडियावर लोक या स्टंट करणाऱ्या तरुणाच्या सुरक्षेसाठी प्रार्थनाही करत आहेत.

तरुणाला बाईकवर स्टंट करणं पडलं भारी; VIDEO मध्ये बघा खतरनाक अॅक्सिडेंट
बाईकवर स्टंट करणं हा काही 'बच्चो का खेल' नाही. स्टंट करताना छोटीशी चूकही जीवघेणी ठरू शकते.आपणही अनेक स्टंट व्हिडिओ बघितले असतील. सोशल मिडियावर असे अनेक व्हिडिओ फिरत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अत्यंत खतरनाक आहे. या व्हिडिओत स्टंट करणाऱ्या तरुणाचा कसा अपघात झाला हे दिसत आहे. सोशल मिडियावर लोक या स्टंट करणाऱ्या तरुणाच्या सुरक्षेसाठी प्रार्थनाही करत आहेत.
फक्त 2 सेकेंदातच झाला अपघात -
व्हिडिओमध्ये एक तरुण बाईकवर स्टंट करताना दिसत आहे. रिकामा रस्ता पाहून तो बाईकवर स्टंट करण्याचा विचार करतो. ही बाईक बुलेटसारखी दिसते आहे. व्हिडिओमध्ये तरुण स्टंट करण्यासाठी बाईकवर सरळ उभं राहण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचा तोल जातो आणि तो केवळ दोन सेकंदांतच खाली कोसळतो. व्हिडिओच्या शेवटी बाईक सरळ जाताना दिसत आहे. व्हिडिओ पाहून तरुणाला गंभीर दुखापत झाली असावी, असे वाटते.
47 लाखहून अधिक लोकांनी पाहिलाय व्हिडिओ -
हा व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर उपलब्ध आहे. हा व्हिडिओ शेअर करताना 'भाऊ, अशी कोणतीही रिस्क घेऊ नका', असे लिहिण्यात आले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 5.9 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अर्थात हा व्हिडिओ आतापर्यंत 55 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. याचबरोबर या व्हिडिओला 2 लाखांहून अधिक लोकांनी लाईकदेखील केले आहे. याचबरोबर इंटरनेट युजर्सनी या व्हिडिओवर कमेंट्सदेखील केल्या आहेत.