वऱ्हाडींची चंगळ... लग्नघराने वऱ्हाडासाठी बुक केलं अख्ख विमान, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 10:09 IST2022-12-05T10:08:26+5:302022-12-05T10:09:04+5:30

इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

The wedding party booked an entire plane for the groom, the video went viral on instagram | वऱ्हाडींची चंगळ... लग्नघराने वऱ्हाडासाठी बुक केलं अख्ख विमान, व्हिडिओ व्हायरल

वऱ्हाडींची चंगळ... लग्नघराने वऱ्हाडासाठी बुक केलं अख्ख विमान, व्हिडिओ व्हायरल

लग्न म्हटलं की तामझाम, धावपळ, दोन्ही कुटुंबांची ओढाताण आणि लग्नाच्या सर्व तयारीत व्यस्त असलेले आयोजक. मात्र, लग्नाची उत्सुकता ही वऱ्हाडी मंडळींनाही लागलेली असते. मित्राचं, नातेवाईकाचं किंवा सहकाऱ्याचं लग्न असल्यावर वऱ्हाड बनून जाण्याचा प्लॅनही हे वऱ्हाडी मंडळी ठरवत असतात. तर, लग्नघरातील कुटुंबीयांकडूनही वऱ्हाड घेऊन जाण्याचं प्लॅनिंग करण्यात येतं. सहसा, ट्रक, टेम्पो, चारचाकी वाहन किंवा बस, लक्झरीमधून वऱ्हाडी मंडलींना लग्नकार्याच्या ठिकाणी नेण्यातं येतं. मात्र, काही हौशी आणि श्रीमंत मंडळी थेट प्लेन बुक करुनही वऱ्हाडींनी नेतात. आता, अशाच एका लग्नाचा व्हिडिओ समोर आला आहे. 

इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. एका जोडप्याने मित्र आणि नातेवाईकांना लग्नकार्यस्थळी नेण्यासाठी चक्क विमानच बुक केलं होतं, या व्हिडिओत विमानाच्या सीटवर बसलेले प्रवाशी दिसत असून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मोठा आनंदही दिसतो. लग्नातील जोडप्यावरही कॅमेऱ्याची नजर पडली असून त्यांनीही हसत आपला प्रतिसाद दिलाय. 

श्रेया शाह या इंस्टा हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. काय वाटतं, आम्ही लग्नासाठी कुठं जात आहोत? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओला १ कोटीपेक्षा अधिक व्हूज मिळाले असून १० लाखांपेक्षा अधिक लाईक्स आहेत. तर, हजारो नेटीझन्सने कमेंट करुन आनंद व्यक्त केला आहे, काहींनी गमतीशीर कमेंटही केल्या आहेत.

Web Title: The wedding party booked an entire plane for the groom, the video went viral on instagram