सोशल मीडियावर Look Between... On keyboard हा ट्रेंड आला कुठून? व्हायरल मीममध्ये नेमकं दडलंय काय, जाणून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 01:43 PM2024-05-02T13:43:50+5:302024-05-02T13:46:12+5:30

मागील काही दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर Look Between E and Y on your keyboard  हा ट्रेंड प्रचंड व्हायरल होताना दिसतोय.

the viral trending meme on social media look between on your keyboard know about all the information  | सोशल मीडियावर Look Between... On keyboard हा ट्रेंड आला कुठून? व्हायरल मीममध्ये नेमकं दडलंय काय, जाणून घ्या 

सोशल मीडियावर Look Between... On keyboard हा ट्रेंड आला कुठून? व्हायरल मीममध्ये नेमकं दडलंय काय, जाणून घ्या 

Trending Meme : मागील काही दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर Look Between E and Y on your keyboard  हा ट्रेंड प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. आपल्या की-बोर्डवरील ठराविक दोन अक्षरांच्या मधील अक्षर पाहायला सांगितलं जातं. आणि त्यानंतर या मीमचा खरा अर्थ उलगडत जातो. पण, हा ट्रेंड नक्की आहे तरी काय? त्या मीमचा अर्थ काय होतो? हे फार कमी लोकांनाच माहिती आहे.  

हल्ली सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक नवा ट्रेंड पाहायला मिळतोय. हा ट्रेंड असा आहे की यूजर्सना त्यांच्या की-बोर्डवरील दोन Key मधील अक्षर पाहण्यास सांगतात. २३ एप्रिल २०२४ या दिवशी हा मीम ट्रेंडिंगमध्ये असल्याचं सांगण्यात येतंय. उदा,  नेटकऱ्यांना त्यांच्या की-बोर्डवरील म्हणजेच H आणि  L या दोन अक्षरांच्या मध्ये पाहण्यास सांगितलं जातं. त्यामध्ये साहजिकचं J आणि K ही दोन अक्षरं दिसतात. ज्याचा अर्थ 'जस्ट किडींग' असा होतो. 

ट्रेंडची सुरूवात कशी झाली?

साधारणत: २०२१ मध्ये 4chan या इमेज बेस्ड वेबसाईटवर पहिल्यांदाच हा मीम शेअर करण्यात आला होता. K-On नावाच्या एका अ‍ॅनिमेटेड सिरीजसोबत याचा संबंध होता असं देखील म्हटलं जातं. ज्यामध्ये तुमच्या की-बोर्डवरील T आणि  O या दोन अक्षरांमध्ये बघा असं या मीमद्वारे सांगण्यात आलं होतं. त्यानंतर इंटरनेटवर हा मीम वाऱ्यासारखा व्हायरल होऊ लागला. 

जवळपास तीन वर्ष जुना असलेला हा ट्रेंड आता पुन्हा एकदा चर्चेत आहे. वेगवेगळ्या ब्रॅंड्सच्या कंपन्यांनी देखील या ट्रेंडचा आधार घेतला आहे. त्याचबरोबर दिल्ली पोलिसांनी सुद्धा यामध्ये उडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनूसार जगभरातून या मीमला जवळपास ७.१ कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 

Web Title: the viral trending meme on social media look between on your keyboard know about all the information 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.