भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 17:29 IST2025-09-23T17:28:24+5:302025-09-23T17:29:36+5:30
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक बाईकस्वार भरधाव वेगात असलेल्या ट्रकमागे स्टंटबाजी करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून जणू काही बाईकस्वाराला आयुष्याचा कंटाळा आला आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो.

भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
नवी दिल्ली : आपण सोशल मीडियावरबाईक स्टंटशी संबंधित अनेक व्हिडिओ बघितले असतील. याशिवाय, बाईक स्टंट करताना झालेल्या अपघातांचे व्हिडिओही आपण बघितले असतील. यातील बहुतेक अपघात अती वेगामुळे होतात. अनेक तरुण स्टंटबाजी करताना स्वतःच्या जीवाची परवा तर करत नाहीत, पण कुटुंबाचीही परवा करत नाहीत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक दुचाकीस्वार अक्षरशः भरधाव वेगात असलेल्या ट्रकसोबत मृत्यूचा खेळ खेळताना दिसत आहे. त्याच्या या कृत्याने किती मोठा अपघात होऊ शकला असता, याची कल्पना कदाचित त्यालाही नसेल. खरे तर, हा व्हिडिओ पाहून आपलाही संंतापच होईल.
बाईकस्वाराचा जीवघेणा स्टंट -
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक बाईकस्वार भरधाव वेगात असलेल्या ट्रकमागे स्टंटबाजी करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून जणू काही बाईकस्वाराला आयुष्याचा कंटाळा आला आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो.
व्हिडिओमध्ये हा बाईकस्वार आपल्या पुढे चालणाऱ्या ट्रकच्या अगदी जवळ बाईक घेऊन जातो. एवढेच नाही, तर तो बाईक 'हँडफ्री' करतो आणि स्वतः बाईकवर मागे जाऊन बसतो. विशेष म्हणजे याच वेळी त्याची बाईक ट्रकच्या अगदी जवळ जाते. यावेली, जर ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावला असता अथवा थोडाही वेग कमी केला असता, तर भीषण अपघात झाला असता आणि बाईकस्वाराचा जीवही जाऊ शकला असता. हा व्हिडिओ पाहण्यास जेवढा भीतीदायक आहे, तेवढाच संतापजनकही आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे आणि लोक यावर विविध प्रकारच्या कमेंटदेखील करत आहेत.
देश चुनौतियों से तो फिर भी सलट लेगा लेकिन...pic.twitter.com/tYcBYnnwYk
— Arvind Chotia (@arvindchotia) September 22, 2025
व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांचा संताप -
हा व्हिडिओ @arvindchotia नावाच्या 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेकांनी त्याला लाईक केले आहे. अनेक सोशल मीडिया युजर्सनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत, "अशा बेजबाबदार लोकांबरोबरच, त्यांच्या पालकांवरही कारवाई व्हायला हवी," असे म्हटले आहे.