महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 14:17 IST2025-12-25T13:52:14+5:302025-12-25T14:17:42+5:30
नोहाच्या स्वयंघोषित पुनर्जन्मानंतर आता एक नवीन घोषणा केली आहे. त्याने देवाच्या सेवकांशी बोलल्याचा आणि तात्पुरते प्रलय टाळल्याचा दावा केला आहे.

महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
स्वत:ला नोहाचा पुनर्जन्म असल्याचा दावा करणाऱ्या एबोह नोहाने आता एक नवीन दावा केला आहे. त्याने या आधी २५ डिसेंबर रोजी मोठा पाऊस पडून मोठा प्रलय येणार म्हणून त्याला बायबलमध्ये वर्णन केल्याप्रमाणे एक बोट बांधण्याचा आदेश देण्यात आला, असे भाकीत केले होते. त्याने स्वतःला आधुनिक काळातील नोह म्हणून घोषित केले आहे. आता, या व्यक्तीने एक नवीन दावा केला आहे.
एका वृत्तानुसार, नोहाचा पुनर्जन्म असल्याचा दावा करणाऱ्या एबो नोहाने या दिवशी एक महाप्रलयकारी घटना घडण्याची भविष्यवाणी केली होती. आज मुसळधार पाऊस सुरू होणार होता, यामुळे जगभरात आपत्ती निर्माण होणार होती, परंतु आता ती टळली असल्याचा त्याने दावा केला.
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
२५ डिसेंबर रोजी पाऊस पडला नाही कारण त्याने देवाला पूर तात्पुरता पुढे ढकलण्याची प्रार्थना केली होती. महाप्रलयापासून वाचण्यासाठी त्याने बांधलेल्या बोटी घाना आणि जगभरातील लोकांच्या गर्दीला सामावून घेण्यासाठी अपुर्या होत्या, असंही त्याने म्हटले आहे.
त्याने देवाच्या सेवकांशी बोललो असल्याचे म्हटले आहे. बोटींमध्ये आश्रय घेणाऱ्या लोकांची संख्या पाहता, त्यांनी त्यांना अतिरिक्त बोटी बांधण्यासाठी वेळ दिला आहे आणि सध्यातरी आपत्ती पुढे ढकलण्यात आली आहे, असा दावा केलाय.
या कारणामुळे प्रलय टळला
एबो म्हणाला, "लोकांनी घाई करू नये. बोटीवर जागा बुक करण्यासाठी घाई करू नये. मी कोणतेही तिकीट विकत नाही किंवा लोकांकडून पैसे घेत नाही. म्हणून लोकांनी घरी राहून आनंद घ्यावा." एबोच्या नवीन दाव्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत, यामध्ये तो सर्वनाश घडवून आणल्याचा दावा करतो.
BREAKING 🚨: Ebo Noah says God has answered our prayers, the rains and floods has been postponed
The reasons being that…
1/2 https://t.co/cQtqusxyBrpic.twitter.com/ryWEg2Rr1d— WithAlvin 🇬🇭 (@withAlvin__) December 24, 2025