डरना मना हैं! दगडावर सरपटणारा हा विचित्र जीव पाहून लोक झाले हैराण, पण हा जीव नेमका आहे तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 13:14 IST2020-06-24T13:13:05+5:302020-06-24T13:14:48+5:30

अनेकांना अजून हेच कळालेलं नाही की, हा जीव नेमका आहे तरी काय. हा व्हिडीओ पाहून लोक अवाक् झाले आहेत.

That's not snake! Viral video is freaking out netizens | डरना मना हैं! दगडावर सरपटणारा हा विचित्र जीव पाहून लोक झाले हैराण, पण हा जीव नेमका आहे तरी काय?

डरना मना हैं! दगडावर सरपटणारा हा विचित्र जीव पाहून लोक झाले हैराण, पण हा जीव नेमका आहे तरी काय?

सोशल मीडियात नेहमीच कोणत्या ना कोणत्या नवीन किंवा विचित्र जीवांचे व्हिडीओ-फोटो शेअर केले जातात. अशाच एका जीवाची सध्या सोशल मीडियात चर्चा सुरू आहे. लोक या जीवाची ओळख पटवण्यात बिझी झाले आहेत. पण अनेकांना अजून हेच कळालेलं नाही की, हा जीव नेमका आहे तरी काय. हा व्हिडीओ पाहून लोक अवाक् झाले आहेत. कारण असा जीव अनेकांनी आधी कधीच पाहिला नाही.

व्हिडीओच्या सुरूवातीला दिसतं की, एक सापासारखा जीव दगडावर सरपटत आहे. पण जसं व्हिडीओतील दृश्य पुढे जातं आणि समोर जे दिसतं ते पाहून लोक हैराण होतात. अनेकजण हेच सांगत आहेत की, त्यांनी असा जीव याआधी कधी पाहिला नाही किंवा त्याबाबत ऐकलं नाही. जास्तीत जास्त लोकांनी हा जीव पहिल्यांदाच पाहिलाय.

व्हिडीओत या जीवाला पाच हात असल्याचे दिसत आहे. आधी पाहिल्यावर असं वाटतं एखादा साप असेल. पण हा जीव साप नाही. हा जीव दगडावरून सरपटत पाण्यात जातो. हा व्हिडीओत  लाइडिया राले नावाच्या यूजरने ट्विटरवर शेअर केलाय. तर या व्हिडीओच्या कॅप्शनला असं लिहिलं आहे की, 'हे काय आहे?'.

आतापर्यंत या व्हिडीओला 4 लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर शेकडो लोकांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. वेगवेगळे लोक याला वेगवेगळी नावे देत आहेत. पण या जीवाबाबत नेमकी माहिती कुणालाही नाही. 

तुम्हालाही या जीवाबाबत माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो. या जीवाचं नाव आहे ब्रिटल स्टार. याला ओफियोरोयड असंही म्हणतात. हा एक समुद्री जीव आहे. जो एका स्टारफिश सारखा दिसतो. तज्ज्ञांनुसार, या जीवाच्या 2 हजारपेक्षा अधिक प्रजाती आहेत.

Video! ...जेव्हा मगरीची पिल्लं एका मोठ्या बगळ्याशी पंगा घेतात, बघा पुढे काय होतं!

Viral Video : 'त्याच्या' तळहातावरील पाणी पित होता साप, अनोखा व्हिडीओ पाहून व्हाल अवाक्...

Web Title: That's not snake! Viral video is freaking out netizens