आयडियाची कल्पना! "अफेअर करा पण भाडं द्या"; पत्नीने पतीच्या गर्लफ्रेंडसोबत केलं अजब 'डिल'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 13:44 IST2026-03-17T13:43:31+5:302026-03-17T13:44:11+5:30
अनोळखी महिलेने आपल्या सोशल मीडिया पोस्ट पाहिल्याचं आणि पतीला फॉलो करत असल्याचं लक्षात आल्यावर या महिलेला पहिल्यांदा संशय आला.

आयडियाची कल्पना! "अफेअर करा पण भाडं द्या"; पत्नीने पतीच्या गर्लफ्रेंडसोबत केलं अजब 'डिल'
थायलंडमध्ये एक अजब घटना समोर आली आहे. एका महिलेने पतीच्या अनैतिक संबंधांचा उलगडा झाल्यानंतर एक अतिशय धक्कादायक निर्णय घेतला. तिने आपल्या पतीला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत राहण्याची परवानगी देण्याच्या बदल्यात दरमहा पैसे घेण्याचा प्रस्ताव मांडला आहे. महिलेचं लग्न एका पोलीस अधिकाऱ्याशी झालं असून त्यांना ८ वर्षांचा मुलगाही आहे. सुरुवातीला तिचं आयुष्य सुखी होतं. दोघंही एकमेकांच्या प्रायव्हसीचा आदर करायचे आणि एकमेकांचे फोन किंवा खासगी आयुष्यात ढवळाढवळ करत नसत.
एका अनोळखी महिलेने आपल्या सोशल मीडिया पोस्ट पाहिल्याचं आणि पतीला फॉलो करत असल्याचं लक्षात आल्यावर या महिलेला पहिल्यांदा संशय आला. मात्र त्यावेळी तिने याकडे गांभीर्याने पाहिलं नाही. पण हळूहळू पतीचं वागणं बदलू लागलं. तो कामाचं कारण सांगून उशिरा घरी येऊ लागला. एकदा तर तो रात्री १ वाजेपर्यंत घरी परतला नाही आणि त्याचा फोनही बंद होता, ज्यामुळे पत्नीचा संशय अधिकच बळावला.
सत्य जाणून घेण्यासाठी पत्नीने एक प्रायव्हेट हेर नेमला आणि त्याला पैसे दिले. अवघ्या एका दिवसाच्या तपासात हेर असलेल्या व्यक्तीने शोधून काढलं की, तिचा पती दुसऱ्या एका महिलेच्या घरी जात असतो. पतीशी सविस्तर चर्चा केल्यावर सत्य समोर आलं. दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याचं पतीने कबूल केलं. तसंच हे नातं असंच सुरू राहणार असल्याचं सांगितलं.
या सर्व प्रकारानंतर पत्नीने एक अजब तोडगा काढला. तिने सांगितले की, जर पतीला आणि त्याच्या गर्लफ्रेंडला एकत्र राहायचं असेल, तर त्यांना दरमहा ३०,००० बाहत (८५,००० रुपये) तिला 'भाडं' म्हणून द्यावं लागतील. अफेअर करा पण भाडं द्या. गर्लफ्रेंड ही या अटीसाठी तयार झाली आणि तिने पैसे ही समस्या नसल्याचं सांगितलं. मात्र पतीने हा प्रस्ताव स्वीकारण्यास नकार दिला.
कायदेतज्ज्ञांच्या मते, पतीला अशा प्रकारे 'भाड्याने देणं' हा करार कायद्याच्या विरोधात आहे. थायलंडमध्ये एका वेळी एकाच लग्नाला कायदेशीर मान्यता आहे. त्यामुळे अशा प्रकारचा कोणताही करार न्यायालयात स्वीकारला जाणार नाही. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले असून लोक यावर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत.