सोशल मीडियावर कधी काही पाहायला मिळेल? हे सांगू शकत नाही. असाच एक व्हिडीओ इंन्स्टाग्रामवर धुमाकूळ घालत आहे, ज्यात एक पुरूष शिक्षक ताल से ताल मिला या गाण्यावर विद्यार्थ्यांसोबत डान्स करताना दिसत आहे. या शिक्षकाच्या स्टेप्स आणि एक्सप्रेशनने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. संबंधित शिक्षकाचा व्हिडिओ अनेकदा पाहूनही मन भरणार नाही, असा त्यांनी डान्स केला. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, संबंधित शिक्षक ताल चित्रपटातील ताल से ताल मिला या गाण्यावर त्याच्या विद्यार्थ्यांसोबत स्टेप्स करताना दिसत आहे. शिक्षकाचा आत्मविश्वास, त्याचे चेहऱ्यावरील भाव आणि स्टेप्स पाहून नेटकरी चकीत झाल्या आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
dubailife814 या नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तर, हजारो लोकांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. एका व्यक्तीने म्हटले आहे की, "शिक्षकांची स्टेप्स पाहून चकीत झालो आहे." दुसऱ्या व्यक्तीने त्याच्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला. "आमच्या काळातही शाळेत असे वातावरण असते तर बरे झाले असते." तिसऱ्या व्यक्तीने शिक्षकाच्या डान्सचे कौतुक करत म्हटले की, "शिक्षकाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे."