Viral Video : जीव वाचवण्यासाठी म्हशीने अशी मारली उडी, सिंहांनी असा कधी विचारही नसेल केला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 15:56 IST2020-05-28T15:47:55+5:302020-05-28T15:56:10+5:30

एक जंगली म्हैस सिंहांपासून जीव वाचवण्यासाठी अशी काही उडी घेतली की, बघून थक्क व्हाल. 

Survival of the fittest video when lions attack on a buffalo api | Viral Video : जीव वाचवण्यासाठी म्हशीने अशी मारली उडी, सिंहांनी असा कधी विचारही नसेल केला!

Viral Video : जीव वाचवण्यासाठी म्हशीने अशी मारली उडी, सिंहांनी असा कधी विचारही नसेल केला!

जेव्हा जीव धोक्यात येतो तेव्हा जीव वाचवण्यासाठी कुणाच्याही अंगात एक वेगळीच ताकद येते. मग ते जंगलातल प्राणी असो वा मनुष्य. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. एक जंगली म्हशीने सिंहांपासून आपला जीव वाचवण्यासाठी अशी काही उडी घेतली की, बघून थक्क व्हाल. 

या घटनेचा थरारक व्हिडीओ व्हायरल झाला असून हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुशांता नंदा यांनी शेअर केलाय. आतापर्यंत या व्हिडीओला 10 हजारांपेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत. 

या व्हिडीओच्या कॅप्शनला नंदा यांनी लिहिले आहे की, 'या जबरदस्त उडीचा अंदाज तर सिंहानीही लावला नसेल. त्यासोबत सिंहाची शिकार सफल होण्याचा दर 30 टक्के आहे'.

या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, तीन सिंह एका जंगली म्हशीला वेढा घालतात. जेव्हा ते म्हशीवर हल्ला करतात म्हैस त्यांच्या अंगावरून उडी घेऊन पळू लागते. म्हैस धावण्यासाठी तिची पूर्ण ताकद लावते.

Web Title: Survival of the fittest video when lions attack on a buffalo api