शाळेतील मुलींची भररस्त्यात फ्री स्टाइल फाइट, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 16:13 IST2024-11-29T16:00:57+5:302024-11-29T16:13:45+5:30
एक विद्यार्थीनींच्या हाणामारीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात काही मुली भर रस्त्यात एकमेकींना मारहाण करताना दिसत आहेत.

शाळेतील मुलींची भररस्त्यात फ्री स्टाइल फाइट, व्हिडीओ व्हायरल
Fight Viral Video : सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी डान्सचे व्हिडीओ तर कधी स्टंटचे व्हिडीओ. अनेकदा तर दोन गटात झालेल्या भांडणाचे किंवा हाणामारीचेही व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या हाणामारीचेही व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक विद्यार्थीनींच्या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात काही मुली भररस्त्यात एकमेकींना मारहाण करताना दिसत आहेत.
व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, रस्त्याच्या बाजूला शाळेतील विद्यार्थीनींमध्ये जोरदार भांडण सुरू आहे. मुली शाळेच्या ड्रेसमध्ये आहेत आणि त्यांच्या पाठीवर बॅगही आहेत. असं दिसत आहे की, दोन मुली एका मुलीला मारत आहे. तर एक मुलगी भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. या भांडणाचं कारण समजू शकलेलं नाही. पण हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Kalesh b/w Group of College Girls on Road pic.twitter.com/Roc5oledMG
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 29, 2024
हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh नावाच्या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तर लोक वेगवेगळ्या गमतीदार कमेंट्सही यावर करत आहेत. एका यूजरने लिहिलं की, 'दीदी हे काय करत आहे'. दुसऱ्या यूजरने लिहिलं की, 'एकीने दुसरीच्या बॉयफ्रेन्डला मेसेज केला असेल'. तिसऱ्याने लिहिलं की, 'आजकाल थेट मारहाणच होते'.