VIDEO : सोशल मीडियावर व्हायरल झाली ही अजब कांद्याची कॉफी, बघून कॉफी पिणं सोडाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 14:54 IST2024-06-13T14:53:23+5:302024-06-13T14:54:06+5:30
एक एक्सपरिमेंटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुम्ही जर कॉफी पिणाऱ्यांपैकी असाल तर तुम्ही नक्की हा व्हिडीओ बघायला हवा.

VIDEO : सोशल मीडियावर व्हायरल झाली ही अजब कांद्याची कॉफी, बघून कॉफी पिणं सोडाल!
जगात खाण्याच्या शौकीन लोकांची काही कमी नाही. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी लोक वेगवेगळे पदार्थ खातात. पदार्थांवर वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपरिमेंट्स केले जातात. काही एक्सपरिमेंट्स चांगले असतात तर काही एक्सपरिमेंट्स डोकं चक्रावून सोडणारे असतात. सोशल मीडियावर अशा एक्सपरिमेंट्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे बघून भूक मरून जाते. असाच एक एक्सपरिमेंटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुम्ही जर कॉफी पिणाऱ्यांपैकी असाल तर तुम्ही नक्की हा व्हिडीओ बघायला हवा.
कांदे टाकलेली कॉफी
कॉफी तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने प्यायले असाल. पण कधी तुम्ही कादे टाकलेल्या कॉफीबाबत ऐकलं का? नक्कीच ऐकलं नसेल. चीनमध्ये कॉफीसोबत आजकाल अजब एक्सपरिमेंट केले जात आहेत. ही कांद्याची कॉफी चीनमध्येच मिळते. 'स्प्रिंग अनियन लॅटे' नाव देण्यात आलं आहे.
कशी बनवतात ही कॉफी
ऑडिटी सेंट्रल नावाच्या वेबसाइटवरील एका रिपोर्टनुसार, ही कॉफी बनवण्याची पद्धत फारच अजब आहे. सगळ्यात आधी कांद्याची पाल बारीक करून एका कपमध्ये टाकतात. त्यानंतर त्यात बर्फ, दूध आणि कॉफी टाकली जाते. नंतर काही शिल्लक राहिलेले कांद्याचे तुकडे वरून टाकले जातात. झाली तुमची 'स्प्रिंग अनियन लॅटे' म्हणजे कांद्याची कॉफी तयार.
#springonionlatter असं जर इन्स्टावर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला अनेक व्हिडीओ बघायला मिळतील. लोक ही कॉफी बघून हैराण झाले होते. सध्या या कॉफीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले असून लोक यावर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.