चॅलेंज! हुडी घातलेल्या बदकाच्या चित्रात आहेत ३ फरक, तीक्ष्ण डोळे असणारेच शोधू शकतील...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 16:01 IST2026-02-25T15:50:33+5:302026-02-25T16:01:35+5:30
Brain teasers : यातील फरक म्हणा किंवा गोष्टी म्हणा शोधताना मेंदू आणि डोळ्यांचा व्यायाम होतो. असाच एक फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.

चॅलेंज! हुडी घातलेल्या बदकाच्या चित्रात आहेत ३ फरक, तीक्ष्ण डोळे असणारेच शोधू शकतील...
Brain teasers : 'स्पॉट द डिफरन्स' पझल्सची क्रेझ दिवसेंदिवस सोशल मीडियावर वाढत चालली आहे. बरेच फोटो यूजर्स सोशल मीडियावर शेअर करतात आणि त्यातील फरक शोधण्याचं चॅलेंजही देतात. काही लोक यातील फरक शोधू शकतात, तर काही लोक यात अपयशी ठरतात. मुद्दा यश किंवा अपयशाचा नाही. हे फोटो चांगला टाईमपास तर करतातच, सोबतच आपला मेंदू आणि डोळ्यांसाठीही चांगले असतात. कारण यातील फरक म्हणा किंवा गोष्टी म्हणा शोधताना मेंदू आणि डोळ्यांचा व्यायाम होतो. असाच एक फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.
'स्पॉट द डिफरन्स' या फोटोंची खासियत ही असते की, दोन्ही फोटो सुरूवातीला एकसारखेच दिसतात. पण मुळात ते एकसारखे नसतात. त्यांमध्ये फार सूक्ष्म असे फरक असतात. या फोटोत आपल्याला हुडी घातलेलं बदक नदी किनारी दिसत आहे. या फोटोत ३ फरक आहेत. जे आपल्याला ४५ सेकंदात शोधायचे आहेत.

खरंतर या फोटोंचं डिझाइन असं केलेलं असतं की, आपल्याला कन्फ्यूजन करतं. सोबतच यातील फरकही सहज दिसतील असे नसतात. ते आपल्याला बारकाईने फोटो बघूनच शोधावे लागतात. ज्यात एक वेगळीच मजा येते. सोबतच आपली आयक्यू लेव्हलही टेस्ट केली जाते.

जर आपल्याला या फोटोतील तीन फरक ठरलेल्या वेळेत दिसले असतील तर आपलं मनापासून अभिनंदन. पण अजूनही दिसले नसतील तर निराशही होऊ नका. कारण ते फरक काय आहेत हे आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. म्हणजे आपलं नेमकं काय चुकत होतं हेही कळेल. खालच्या फोटोत यातील ३ फरक बघू शकता.

वरच्या फोटोत यातील ३ फरक सर्कल केलेले बघू शकता.